Bhaskar Jadhav vs Brahmin: ब्राम्हणांवर बाण,कोकणात धुमशान;कोकणात जातीपातीचं राजकारण? Special Report
abp majha web team
Updated at:
12 Aug 2025 09:38 PM (IST)
आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जातीचं कार्ड समोर केल्याचा आरोप होत आहे. त्यांनी 'खोतकी' परत आणायची का, असा प्रश्न विचारत ब्राह्मण समाजावर टीका केली. आपल्या स्वार्थासाठी सामाजिक ऐक्य बिघडवत असल्याचा आरोप ब्राह्मण सहाय्यक संघाने केला आहे. यावर भास्कर जाधव यांनी टीकेचा सूर आणखी वाढवला. मुंबईतील शिवसेना भवन येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी कुणबी विरुद्ध ब्राह्मण अशी मांडणी केली. पारंपरिक विरोधकांना त्यांनी 'अनाजीपंत' उपमा दिली आणि ब्राह्मण समाज 'पाताळ यंत्री' असल्याची टीका केली. "एक असला तरी तुम्हाला माहित नाही काय करून गिरमिट लावतो," असे वक्तव्य त्यांनी केले. गुहागरमधील जातीय समीकरणात कुणबी समाज सर्वाधिक असून, ब्राह्मण समाजाची मते कमी असली तरी नातू कुटुंबामुळे त्यांचा प्रभाव आहे. भास्कर जाधव यांच्यासमोर मच्छिमार आणि इतर समाजाला एकत्र ठेवण्याचे आव्हान आहे. त्यांच्या २०२४ च्या निवडणुकीतील विजयाचे कमी मताधिक्य भविष्यातील चिंतेचे कारण ठरले आहे. कोकणात जातीय तेढ निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.