Riya Barde वर पोलिसांची कोणती कारवाई? भारतात बांगलादेशींची घुसखोरी का वाढतेय? Special Report
भारतात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. आता तर मुंबईजवळ एका अडल्ट स्टारला पोलिसांनी अटक केलीय... जी बांगलादेशी नागरिक असल्याचं उघड झालंय...धक्कादायक म्हणजे, या अॅडल्ट स्टारचं संपूर्ण कुटुंबच बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्यास आहे... पाहूयात...
भारतात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत आहे.
मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उल्हासनगरमधून पोलिसांनी एका बांगलादेशी अभिनेत्रीला अटक केली आहे.
या अभिनेत्रीचं आख्खं कुटुंबच बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्यास आहे.
ही अभिनेत्री उल्हासनगरमध्ये रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे या मराठी नावाने राहात होती. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलिसांनी तिला बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य केल्याच्या आरोपांखाली अटक केली आहे. रिया, तिची आई, तिचा भाऊ आणि तिची बहीण अशा सगळ्यांनीच खोट्या कागदपत्रांच्या मदतीने भारतीय नागरिकत्व मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.