Morbi Bridge Collapse Special Report : मोरबी पूल दुर्घटनास्थळी एबीपी माझा
गुजरातमधील मोरबीमध्ये काल सायंकाळी एक मोठी दुर्घटना घडली. मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसलला... या दुर्घटनेत १४१ जणांचा मृत्यू झालाय.. तर १००हून अधिक जण जखमी झालेत... सुमारे ४०० हून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती व्यक्त होतेय..बचावासाठी एनडीआरएफ आणि गरूड कमांडोंकडून घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. दरम्यान 5 दिवसापुर्वीच हा पूल दुरुस्त करण्यात आला होता... यामुळे पुलाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय..दरम्यान पुलाची देखभालदुरुस्ती करणाऱ्या कंपनींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. तसंच अधिक चौकशीसाठी एसआयटीचीही स्थापना करण्यात आलीये.. १०० जणांची क्षमता असलेल्या पुलावर दुर्घटनेवेळी ४०० जण उपस्थित असल्याची माहिती मिळतेय... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. बचावकार्यासाठी तातडीने पथके पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंदर्भात एक ट्विट देखील केले आहे. दरम्यान आज पंतप्रधान मोदी घटनास्थळी भेट देण्याची शक्यता आहे...