Saat Barachya Batmya 7/12 : अवकाळी, गारपिटीमुळे 2 एकरवरील मोसंबीचं मोठं नुकसान
Saat Barachya Batmya 7/12 : अवकाळी, गारपिटीमुळे 2 एकरवरील मोसंबीचं मोठं नुकसान
बुलढाणा जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून सततच्या अवकाळीने ने फळबागा सह भाजीपाला, कांदा, आंबा पिकांचे प्रचंड नुकसान झालेय. त्यामधे चिखली, बुलढाणा, मेहकर, खामगाव, मोताला तालुक्यात प्रचंड गारपीट, अवकाळी पाऊस झाला .. एकीकडे शासकीय कर्मचारी पंचनामे करून जातात, मात्र पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट होतेय, त्यामुळे पिकांचे नुकसान होते आहे. चिखली तालुक्यात मागील चार ते पाच दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस , गारपीट होत असून पिकाचे नुकसान होत आहे. सवणा येथील ज्ञानेश्वर मिसाळ यांच्या दोन एकर मोसंबी शेतात अवकाळी पावसाने मोसंबीचे प्रचंड नुकसान झालेय. लाखो रुपये खर्च करून लहान मुलांप्रमाणे शेतकरी ज्ञानेश्वर मिसाळ यांनी मोसंबीची झाडे लहान ची मोठी केली, विहिरीला पाणी नसताना परिसरातील शेतकऱ्यांकडून पणी घेऊन मोसंबीची बाग जगविली. आता झाडांना फळे लागली असून अवकाळी पावसाने मात्र त्यांचे प्रचंड नुकसान झालेय.