Majha Vishesh | महापुरुषांच्या नावांवरून वादांची वादळं कशासाठी? राज्यसभेतील घोषणेवर आक्षेप कुणाचा? माझा विशेष
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jul 2020 05:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यसभेत उदयनराजे भोसले यांनी काल खासदारकीची शपथ घेतली. पण हा शपथविधी भलत्याच कारणामुळे वादात सापडला आहे. शपथविधीनंतर उच्चारलेल्या जयघोषावर सभापतींनी आक्षेप घेतला आणि त्यावरुन महाराष्ट्रात अस्मितेचं राजकारण पेटलं आहे. तर काँग्रेसवर झालेल्या आरोपाबाबत उत्तर देण्यासाठी त्या शपथविधीवेळी सभागृहात उपस्थित असलेले खासदार राजीव सातव सरसावले. या घटनेतून भाजपचा खरा चेहरा समोर आल्याचं त्यांनी म्हटलं. या विषयावरून राजकारण केलं जातंय का आणि हा आक्षेप नेमका कुणी घेतला यावर ही एबीपी माझाची विशेष चर्चा.