Mamta Sindhutai Sapkal Majha Katta: माईंचा वारसा नेटाने सांभाळणाऱ्या ममता सपकाळ माझा कट्ट्यावर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुताईंनी आयुष्यभर कमावलेलं विश्वास आणि जिव्हाळ्याच संचित, त्यांचा वारसा चालवणं सोप काम नव्हतं. माईंनी आपल्या हयातीत अनाथांसाठी, गोरगरिबांसाठी, गरजुंसाठी मदतीचा वटवृक्ष उभारला आणि ममता ताई त्या वटवृक्षाची निगा राखण्याची जबाबदारी पेलायचा प्रयत्न करतायेत.
माई जगाचा निरोप घेताना आपल्या २१० मुलांची आई होण्याची जबाबदारी ममता ताईंवर सोपवून गेल्यात. माईंनी लावलेली माया आटू द्यायची नाही या भावनेनं ममता ताई आणि त्यांची टीम खंबीरपणे पुढे जाऊ पाहतेय. पण समोरची वाट सोपी नाहीये. अडचणींचा डोंगर पुढे उभा आहे.
सिंधुताईंचं एक फेमस वाक्य होतं भाषण नाही तर राशन नाही. सिंधुताईंच्या पश्चात या २१० मुलांच्या राशनची व्यवस्था कशी केली जातेय, त्या गेल्यानंतर काय बदललं, त्यांना भरभरुन मदत देणारे हात सोबत आहेत का, त्या मदतीचा ओघ कसा सुरु आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं ममता ताईंकडून जाणून घेऊयात.