माझा कट्टा : सुशांत प्रकरण #JusticeForSushant ते #JusticeForKangna पर्यंत कसं पोहोचलं? उर्मिला मातोंडकरचा सवाल | Urmila Matondkar
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Sep 2020 10:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांनी कंगना रनौतने बॉलिवूडवर केलेल्या आरोपांबाबत सडेतोड उत्तर दिलं आहे. कंगनाचे बॉलिवूडमध्ये ज्या काही लोकांशी वाईट संबंध आहेत, ते चार-दहा लोक म्हणजे बॉलिवूड नाही. बॉलिवूड खुप मोठी, सतत मेहनत करणारी इंडस्ट्री आहे. मात्र काही लोकांमुळे संपूर्ण बॉलिवूडला बदनाम करणे अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. ज्या इंडस्ट्रीने तुम्हाला घडवलं, त्याबद्दल असं बोलणे चुकीचं आहे, असं उर्मिला मांतोडकर यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या.