Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.00 AM : 05 JULY 2024
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.00 AM : 05 JULY 2024
संत ज्ञानोबांची पालखीचं जेजुरीमध्ये स्वागत, माऊलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण केल्यामुळे माऊली पिवळी झाल्याची उपस्थित वारकऱ्यांना अनुभूती, यावेळी पंचक्रोशीतील नागरिक हजर.
पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात रात्री उशिरा चांदीची मेघडंबरी बसविण्याच्या कामाला सुरवात, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाची जोरदार तयारी.
संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखीचं धाराशिव जिल्ह्यात आगमन, कळंब शहरात हजारो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन.
अहमदनगरच्या श्रीगोंदा येथील संत श्री महंमद महाराज दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. शेख महंमद महाराजांच्या दिंडीचे यंदाचं दुसरं वर्ष. दिंडीत जवळपास तीन हजार भाविकांचा सहभाग.
आषाढीच्या तोंडावर प्रशासनानं नोटीस न देता अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केल्यानं व्यापारी संतप्त, बेकायदा अतिक्रमित इमारती, खोके, टपऱ्या हटविण्याची व्यापाऱ्यांची मागणी.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद, सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्याकडून मोफत अर्ज भरून घेण्याचं काम सुरू. महिलांची मोठी गर्दी.
सोलापुरात जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकेने लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काटेकोरपणे नियोजन करा, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश.
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
