Majha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 6.30 AM | 12 Jan 2025 | ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखासदार सुप्रिया सुळे आज परभणीच्या दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार, परभणीत सुरू असलेल्या आंबेडकरी अनुयायांच्या धरणे आंदोलनालाही भेट देणार.
केज जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून विष्णू चाटेला दोन दिवसांची सीआयडी कस्टडी, सरकारी वकिलांनी मागितली होती ८ दिवसांची कस्टडी.
खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, अशक्तपणामुळे डॉक्टरांकडून कोठडीतच उपचार.
अनुदान देण्याचं सांगून वाल्मिक कराडनं १४० शेतकऱ्यांना ११ कोटी २० लाखांचा गंडा घातला, पैसे परत मागितल्यावर मारहाण करून हाकलून दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, शेतकऱ्यांची मागणी.
वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, तसंच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री करू नये, अशीही मराठा समाजाची बैठकीत मागणी.
सर्वांना एकत्र येऊनच बीड, परभणी शांत करावं लागेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन.