Rajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special Report

Continues below advertisement

Rajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special Report

महाविकास आघाडीचा पोपट मेल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झालीय. या चर्चेचं निमित्त ठरतेय ठाकरेंच्या शिवसेनेची स्वबळाची भाषा. २०१९ साली विधानसभा निवडणुकांनंतर सुरु झालेला महाविकास आघाडीचा संसार यंदाच्या महापालिका निवडणुकांआधी मोडण्याची दाट शक्यता आहे. ठाकरेंकडून स्वबळाची भाषा सुरु झाली असून काँग्रेसदेखील त्यांना आघाडीत थांबवण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. नेमकं काय घडतंय... पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून.चार नेत्यांची ही चार वाक्यं महाराष्ट्राच्या राजकारणातले बदलाचे संकेत मिळायला पुरेशी आहेत..
२०१९ साली स्थापन झालेली महाविकास आघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलीय. आतापर्यंत एकमेकांवर आडून आडून टीका करणारे मविआतल्या पक्षांनी आता उघडपणे स्वबळाची भाषा सुरु केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram