ABP Majha Headlines | 6.30 AM | 12 Jan 2025 | एबीपी माझा हेडलाईन्स | Maharashtra Politics
ABP Majha Headlines | 6.30 AM | 12 Jan 2025 | एबीपी माझा हेडलाईन्स | Maharashtra Politics
आज शिर्डीत भारतीय जनता पक्षाचे राज्य अधिवेशन होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचे उद्घाटन, भाजपचे प्रमुख पदाधिकारी शिर्डीत दाखल, पदाधिकारी घेणार साईबाबांचे दर्शन.
सामान्य नागरिकांना आता सर्वोच्च न्यायालय आतून पाहता येणार. सर्वोच्च न्यायालयाची गाईडेड टूर सुरु, दूसरा आणि चौथा शनिवार सोडून अन्य शनिवारी नागरिकांना सर्वोच्च न्यायालय आतून पाहाण्याची संधी. यासाठी अगोदर नोंदणीची व्यवस्था.
मविआ टिकेल की तुटेल, याकडे आमचं लक्ष नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया...तर ठाकरेंनी विचारधारा सोडल्याचा फटका, काही दिवसांनी पक्षही शिल्लक राहणार नाही, शिंदेंच्या शिवसेनेची टीका...
भाजप नेते रवींद्र चव्हाणांची भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड..राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी केली चव्हाणांची नियुक्ती
नंदुरबारच्या बालआमराई गावची टॅलेंटेड बच्चे कंपनी, दोन्ही हातांनी लिहिण्याचं कसब, शिक्षकांच्या प्रयत्नांनी विद्यार्थ्यांनी आत्मसात केलं कौशल्य
इंग्लंडविरुद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेसाठी वेगवान गोलंदाज शमीचं पुनरागमन, अक्षर पटेलकडे उपकर्णधारपद, २२ जानेवारीला पहिली लढाई