एक्स्प्लोर
Mahayuti vs MVA | मातोश्री परिसरात बॅनरबाजी, ठाकरे गटावर मराठीच्या घाताचा आरोप!
वांद्रे कलानगर परिसरामध्ये, थेट मातोश्री निवासस्थान परिसरात, त्रिभाषा सूत्रावरनं ठाकरे सरकारनेच मराठीचा घात केला असा मजकूर असलेले बॅनर्स लावण्यात आले आहेत. "त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं होतं हे विसरलात की काय?" असा थेट प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेला विचारण्यात आला आहे. तसेच "सत्य बाहेर आलं घशात गेले दात उबाटानेच केला मराठीचा घात" असा मजकूरही या बॅनरवर आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून हे बॅनर्स महानगरपालिकेकडून काढण्यात येत आहेत. आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी या ठिकाणचा आढावा घेतला. महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्रावरुन सतत राजकारण होताना दिसत आहे. या बॅनरवर कुठल्याही पक्षाचे चिन्ह नसले तरी उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात त्रिभाषा सूत्रावरुन घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस संदर्भात नेमलेल्या कार्यगटाच्या अनुषंगाने ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. यापूर्वी हिंदी शक्ती विरोधात मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झाला होता. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाचा तृतीय भाषा संदर्भातला जीआर जाळून आंदोलनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने हिंदी सक्तीचा विरोध झाल्यानंतर तो जीआर मागे घेतला होता आणि तो रद्द करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला खोचक टोले लगावणारे हे बॅनर्स आहेत.
All Shows
माझा सिटी न्यूज

'मामलेदार मिसळ'चे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेकर यांचं निधन, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Made In China | दिवाळीनिमित्त चायनीज वस्तूंची चलती, पुण्यातील बाजारपेठांमध्ये चीनचा माल विक्रीला

Breakfast Chat | चॉकलेट बॉयकडून बायकोला काय गिफ्ट? पाडव्यानिमित्त स्वप्नील जोशी आणि लीना जोशीसोबत खास गप्पा | ABP Majha

Breakfast Chat | दारुबंदीचा निर्णय घाईने घेतला, नवनिर्नाचित अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांशी बातचीत | ABP Majha

Breakfast Chat | माझा उल्लेख माहेरवाशीण असा केला तरी असा भाऊ कोणत्याच बहिणीला नको : दीपाली सय्यद | ABP Majha




























