TOP 50 : संध्याकाळच्या टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024 : ABP Majha
परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेशनात कायदा, याच अधिवेशनात नव्या कायद्याचं विधेयक मांडणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा.
महायुती सरकारकडून १ लाख ८ हजार पदांवर भरती प्रक्रिया सुरू, ७० हजार जणांना नियुक्त पत्र प्रदान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती.
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोठी वाढ, २०१४-२०२४ या काळात राज्याची अधिक प्रगती, अभिभाषणावरील चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर.
९७ टक्के पॉलिश्ड डायमंडची निर्यात मुंबईतून, उद्योग गुजरातला चालले हे कथानक खोटं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर, तर मलबार गोल्डची मुंबईत १७०० कोटींची गुंतवणूक, फडणवसांची माहिती.
अंबादास दानवे यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केल्यानं निलंबनाचा कालावधी कमी केला जाण्याची शक्यता. कालावधीबाबतचा निर्णय उद्या बैठकीत घेतला जाणार.
सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी, जनतेचे प्रश्न मला मांडू द्या, निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया.
सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी, जनतेचे प्रश्न मला मांडू द्या, निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया.
लोकसभेत राहुल गांधींनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद. राहुल गांधींवर हल्ला होण्याची शक्यता. गुप्तचर विभागाकडे इनपुट. गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर राहुल गांधी आणि त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली.