WhatsApp Upcomig Feature: मस्तच! WhatsApp मध्ये आलं भन्नाट फिचर, जोडप्यांसाठी ठरेल मजेशीर
WhatsApp Upcomig Feature: व्हॉट्सॲपमध्ये फेव्हरेट कॉन्टॅक्ट हे नवीन फीचर येणार आहे. हे फिचर कसे काम करणार आणि त्याचा युजर्सना कसा फायदा होईल याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
![WhatsApp Upcomig Feature: मस्तच! WhatsApp मध्ये आलं भन्नाट फिचर, जोडप्यांसाठी ठरेल मजेशीर WhatsApp new Favourite contact feature is coming currently company is working on this feature detail marathi news WhatsApp Upcomig Feature: मस्तच! WhatsApp मध्ये आलं भन्नाट फिचर, जोडप्यांसाठी ठरेल मजेशीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/04/9ad9010df7b543a846bd0ddd003231131707066922573720_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : WhatsApp हे जगातील लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. भारत आणि अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांमध्ये या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. व्हॉट्सॲप आपल्या ॲपमध्ये सतत नवनवीन फीचर्स अॅड करत असातात. यामुळे युजर्सना त्यांच्या अॅपकडे आकर्षिले जातात. दरम्यान व्हॉट्सॲपमध्ये आता एक नवे फिचर येणार आहे. तसेच जोडप्यांसाठी हे फिचर मजेशीर ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. या फिचरविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
व्हॉट्सॲपमध्ये येणार मजेशीर फिचर
WhatsApp कोणतेही फिचर रिलीझ करण्यापूर्वी चाचणी करते. त्यासाठी कंपनी आपले कोणतेही फिचर सुरुवातीला फक्त बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध करुन देते. बीटा व्हर्जनचे काही निवडक युजर्स व्हॉट्सॲपच्या नवीन फिचर वापरुन त्याविषयी रिव्ह्यू देतात. जर व्हॉट्सॲपला बदल करण्यास वाव दिसला तर ते तसे करतात, अन्यथा ते त्यांचे नवीन फिचर ते त्यांच्या सर्व युजर्ससाठी उपलब्ध करुन घेते.
यावेळी व्हॉट्सॲपने एका अनोख्या फीचरची चाचणी सुरू केली आहे, ज्याद्वारे व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही तुमचे कॉन्टॅक फेवरेट करु शकता. त्यानंतर तुम्ही त्या त्या कॉन्टॅकला सहज कॉल किंवा मेसेज करू शकाल. म्हणजे आता तो कॉन्टॅक तुमच्या चॅटलिस्टमध्ये शोधून कॉल वैगरे करण्याची गरज भासणार नाही.
आयफोनमध्ये नवीन फीचर येणार
व्हॉट्सॲपची माहिती देणाऱ्या WABetaInfo या वेबसाइटने या फीचरविषयी माहिती दिली. त्यांच्या वेबसाईटनुसार, कंपनीने हे फीचर फक्त iOS च्या बीटा व्हर्जनसाठी जारी केले आहे. म्हणजेच सध्या कंपनी फक्त आयफोन वापरकर्त्यांसाठी हे फीचर आणणार आहे. अॅपलमध्ये या फिचरची चाचणी पूर्ण झाल्यानंतर WhatsApp इतर सर्व युजर्ससाठी हे फिचर उपलब्ध होणार आहे. कंपनीने या नवीन फीचरला फेव्हरेट कॉन्टॅक्ट असे नाव दिले आहे. सध्या या फिचरवर काम सुरु असल्याची माहिती देण्यात आलीये.
व्हॉट्सअॅपमध्ये आलं नवं फिचर
व्हॉट्सअॅपच्या आणखी नवीन फिचरचे नाव अॅप अपडेट्स असं आहे. हे फिचर सध्या रोलिंग आऊट स्टेटसमध्येच आहे. या फीचरद्वारे यूजर्सना अॅपच्या लेटेस्ट अपडेटची सूचना आणि व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्येच ऑटो अपडेटचा पर्याय मिळेल. यामुळे व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट शोधण्यासाठी यूजर्सना गुगल प्ले स्टोअरवर जाण्याची गरज भासणार नाही.WhatsApp ने सध्या हे अपडेट फक्त निवडक बीटा युजर्ससाठी आणले आहे. बीटा युजर्स बीटा व्हॉट्सअॅपच्या या कंपनीच्या नवीन फिचर्सची चाचणी करतात आणि त्यामध्ये काही कमतरता असल्याच त्याविषयी कंपनीला फीडबॅक देतात. उणीवा दूर केल्यानंतर, कंपनी हळूहळू सामान्य वापरकर्त्यांसाठी देखील हे फिचर सुरु करते.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)