Bharat GPT : ChatGPT ला टक्कर देण्यासाठी येत आहे 'Bharat GPT', Jio ने सुरू केली आहे तयारी!
ChatGPT ला टक्कर देण्यासाठी आता Reliance Jio Infocomm चे चेअरमन आकाश अंबानी हे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) AI टूल आणणार आहे.
Bharat GPT : ChatGPT ला टक्कर (Tech News) देण्यासाठी आता Reliance Jio Infocomm चे चेअरमन आकाश अंबानी हे नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) AI टूल आणणार आहे. हे 'Bharat GPT' या नावाने हे AI टूल ओळखले जाणार आहे. जिओ स्वतःचे टेलिव्हिजन OS पण तयार करत आहे. ही माहिती आकाश अंबानी यांनी आयआयटी बॉम्बेच्या ॲन्युअल टेक फेस्ट दरम्यान दिली आहे. कसं असेल ते 'Bharat GPT' ?, यावर कोण कोण काम करत आहे? या माध्यमातून नेमकी कोणती कामं सोपी होणार आहे? पाहुयात...
ChatGPT शी स्पर्धा करण्यासाठी आकाश अंबानी यांनी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी सांगितले की ते ' BharatGPT' वर काम करत आहेत. हा कार्यक्रम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT-Bombay) च्या सोबतीने तयार करण्यात आला आहे.
रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे, की आकाश अंबानी यांनी या बाबतची माहिती IIT-Bombay इंस्टिट्यूटच्या ॲन्युअल टेक फेस्ट मध्ये दिली आहे. BharatGPT आणि Open AI ने तयार केलेले Chat GPT यांची आता एकमेकांशी स्पर्धा होणार आहे आणि संपूर्ण जगभरात याचीच चर्चा सुरू आहे.
आकाश अंबानीचं जिओ 2.0 व्हिजन -
आकाश अंबानी यांनी एक जबरदस्त इको सिस्टम तयार करणे का महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले. सोबतच कंपनीच्या व्हिजन Jio 2.0 बद्दल माहिती शेअर केली. खरं तर 2014 मध्ये, IIT Bombay सोबत एक पार्टनरशिप झाली होती, ज्याचा उद्देश जनरेटिव्ह AI तयार करणे आणि ChatGPT प्रमाणे असणारे एक मोठं आणि चांगलं प्लॅटफॉर्म तयार करणं आहे.
काय आहे ChatGPT?
ChatGPT एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टुल आहे. हा एक चॅट बॉक्स आहे, जो अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि त्यासोबतच कंटेंट रायटिंग करण्यासाठी मदत करू शकतो. याच्या मदतीने सोशल मीडिया पोस्ट, लेटर , अशा अनेक गोष्टी सहजरीत्या लिहू शकतो. सोबत तुम्ही अनेक विषयातील समस्यांचे उत्तर इथून मिळवू शकतात. ह्या ChatGPT ने Open AI या कंपनीने तयार केलं आहे. असंच काम करणारं BHARAT GPT तयार करण्यात येत आहे.
इतर महत्वाची बातमी-