Samsung Smartphone : आकर्षक लूक आणि फास्ट चार्जिंग स्पीडसह Samsung Galaxy F15 5G स्मार्टफोन लॉन्च; किंमत माहितीये?
Samsung Smartphone : दिसायला एकदम आकर्षक असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ओन्ली 6.5 इंच सुपर एएमओएलईडी डिस्प्ले आहे.
Samsung Smartphone : सॅमसंग (Samsung) या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डने गॅलॅक्सी एफ15 5जी च्या लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन अनेक अर्थाने खास आहे. तसेच, यामध्ये पूर्वीच्या स्मार्टफोनपेक्षा अधिक फीचर्स अपडेट करण्यात आले आहेत. गॅलॅक्सी एफ15 5जी सेगमेंट बेस्ट 6000 एमएएच बॅटरी आणि इतर सेगमेंट-ओन्ली फीचर्स जसे की, सुपर एएमओएलईडी डिस्प्ले, अँड्रॉईड अपग्रेड्सचे चार जनरेशन्स आणि पाच वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्ससह सज्ज आहे.
या संदर्भात सॅमसंग इंडियाच्या एमएक्स बिझनेसचे उपाध्यक्ष आदित्य बाबर म्हणाले, ''आमचा पहिला 2024 गॅलॅक्सी एफ सिरीज स्मार्टफोन गॅलॅक्सी एफ15 5जी सह आम्ही पॉवरफुल डिव्हाईसेसच्या माध्यमातून ग्राहकांचे जीवन सक्षम करण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करत आहोत. गॅलॅक्सी एफ15 5जी च्या लाँचमधून अर्थपूर्ण नाविन्यतेप्रती आमची अविरत समर्पितता दिसून येते, ज्यामुळे यूजर्स संपूर्ण क्षमता अनलॉक करू शकतात."
Samsung Galaxy F15 5G ची डिझाईन आणि डिस्प्ले
सॅमसंग गॅलॅक्सी एफ15 5जी चा लूक प्रिमिअम सिग्नेचर आहे. दिसायला एकदम आकर्षक असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ओन्ली 6.5 इंच सुपर एएमओएलईडी डिस्प्ले आहे. सुपर एएमओएलईडी डिस्प्लेसह विशेषत: प्रखर सुर्यप्रकाशात टेक्नॉलॉजी प्रेमी जनरेशन झेड आणि मिलेनियम ग्राहकांना सोशल मीडिया फिड्स स्क्रोल करणे सोपे जाते. हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्रूव्ही व्हायोलेट आणि जॅझी ग्रीन या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
बॅटरी कशी आहे?
गॅलॅक्सी एफ15 5जी मध्ये सेगमेंट-बेस्ट 6000 एमएएच बॅटरी आहे, जी स्मार्टफोनला जवळपास दोन दिवसांपर्यंत चालू शकते. तसेच, 25 वॅट सुपर-फास्ट चार्जिंग स्पीड मिळतो.
प्रोसेसर
प्रभावी सेगमेंट-ओन्ली फीचर्ससह गॅलॅक्सी एफ15 5जी मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6100+ चिपसेटची पॉवर आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये रॅम प्लस वैशिष्ट्य आहे, जे जवळपास 12 जीबीपर्यंत अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम देते. यामधून सुलभपणे अॅप कार्यरत राहण्याची खात्री मिळते.
कॅमेरा फीचर कसं आहे?
गॅलॅक्सी एफ15 5जी मध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा सेटअपसह व्हिडीओ डिजीटल इमेज स्टेबिलायझेशन (व्हीडीआयएस) आहे, जे अस्थिरता किंवा हालचालींमुळे व्हिडीओजमध्ये येणारे ब्लर किंवा व्यत्यय कमी करते. गॅलॅक्सी एफ15 5जी मध्ये आकर्षक सेल्फीज कॅप्चर करण्यासाठी 13 मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा देखील आहे.
मेमरी व्हेरिएण्ट्स, किंमत, उपलब्धता आणि ऑफर्स
या तीन आकर्षक कलरमध्ये उपलब्ध असलेला गॅलॅक्सी एफ15 5जी 4 जीबी + 128 जीबी आणि 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएण्ट्समध्ये येतो. हा स्मार्टफोन 11 मार्चपासून फ्लिपकार्ट, Samsung.com वर आणि निवडक रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल.
महत्त्वाच्या बातम्या :