एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Paytm : 'पेटीएम अॅप' 29 फेब्रुवारीनंतरही सुरु राहणार, सीईओ विजय शर्मा यांची माहिती 

Paytm : पेटीएम अॅप हे 29 फेब्रुवारीनंतरही सुरु राहणार असल्याची माहिती कंपनीचे सीईओ विजय शर्मा यांनी याबाबत माहिती दिलीये.

मुंबई : पेटीएम बँकेला (Paytm Bank) नुकतंच भारतीय रिझर्व्ह बँकेने अर्थातच आरबीआयकडून निर्देश देण्यात आलेत. या निर्देशांबाबत प्रतिक्रिया देत पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर यांनी याबाबत भाष्य करत पेटीएम युजर्सना अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलीये. तसेच त्यांनी आश्वासन देत, पेटीएम अॅप हे 29 फेब्रुवारीनंतरही सुरु राहणार असल्याचं सांगितलं आहे.  विजय शेखर शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ''प्रत्येक पेटीएमरला सांगू इच्छितो की, तुमचे आवडते ॲप कार्यरत आहे आणि 29 फेब्रुवारीनंतर देखील  कार्यरत राहिल. तुमच्या अविरत पाठिंब्यासाठी मी आणि प्रत्येक पेटीएम टीम सदस्य तुमचे आभार मानतो'

त्‍यांनी ट्विटमध्‍ये पुढे म्‍हटले आहे की, ''प्रत्‍येक आव्‍हानासाठी सोल्‍यूशन असते आणि आम्‍ही सर्व नियमांनुसार देशातील आमच्‍या युजर्सना सेवा देण्‍यासाठी कटिबद्ध आहोत. भारताला आर्थिक सेवांमधील पेमेंट नाविन्‍यता आणि सर्वसमावेशकतेसाठी जागतिक मान्‍यता मिळत राहतील, ज्‍यामध्‍ये पेटीएमकरो सर्वात मोठे चॅम्पियन ठरेल. तसेच आरबीआयच्या निर्देशानंतर पेटीएम युजर्सना चिंता करण्याची गरज नाही. कारण यामध्ये म्हटलं आहे की, पेटीएम अॅप हे सुरु आहे आणि ते सुरु आहे. 

पेटीएमच्या सेवा राहणार सुरु

पेटीएमद्वारे देण्‍यात येणाऱ्या बहुतांश सेवा विविध बँकांसोबत सहयोगाने असल्‍यामुळे पेटीएम आणि त्‍यांच्‍या सेवा 29 फेब्रुवारीनंतरही सुरु राहतील. पेटीएमद्वारे देण्‍यात येणाऱ्या बहुतांश सेवा विविध बँकांसोबत (सहयोगी बँकासह) सहयोगाने असल्‍यामुळे पेटीएम आणि त्‍यांच्‍या सेवा 29 फेब्रुवारीनंतर देखील कार्यरत राहतील. तसेच आरबीआयने पेटीएमला सांगितले आहे की, युजर्सची बचत खाती, वॉलेट्स, फास्‍टटॅग्‍स आणि  एनसीएमसी खात्‍यांमधील जमा रकमेवर काहीच परिणाम होणार नाही आणि ते विद्यमान शिल्‍लक रकमेचा वापर करणे सुरू ठेवू शकतात. पेटीएमच्‍या सहयोगी बँकेबाबत नुकतेच आरबीआयने सादर केलेल्‍या निर्देशांचा पेटीएम मनी लिमिटेडच्‍या (पीएमएल) कार्यसंचालनांवर किंवा इक्विटी, म्‍युच्‍युअल फंड किंवा एनपीएसमधील ग्राहकांच्‍या गुंतवणूकांवर कोणताच परिणाम होणार नाही. 

पेटीएमच्‍या इतर आर्थिक सेवा जसे कर्ज वितरण आणि विमा वितरण कोणत्याही प्रकारे त्‍यांच्‍या सहयोगी बँकेशी संबंधित नाहीत आणि नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील. पेटीएमच्‍या ऑफलाइन पेमेंट नेटवर्क ऑफरिंग्‍ज जसे पेटीएम क्‍यूआर, पेटीएम साऊंडबॉक्‍स, पेटीएम कार्ड मशिन नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील, जेथे त्‍यामध्‍ये नवीन ऑफलाइन मर्चंट्सना देखील ऑनबोर्ड करता येऊ शकते.  पेटीएम अॅपवरील मोबाइल रिचार्जेस्, सबस्क्रिप्‍शन्‍स आणि इतर रिकरिंग पेमेंट्स कार्यरत राहतील.

ही बातमी वाचा : 

Paytm च्या कोणत्या सेवा 29 फेब्रुवारीनंतरही सुरु राहणार? जाणून घ्या सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Dhananjay Munde: धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा टक्का वाढला, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?
राज्यात मतदानाचा टक्का वाढला; विधानसभेची अंतिम टक्केवारी समोर, कोणाच्या पारड्यात सर्वाधिक मतं?
Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेसवेवर व्होल्वो बस अन् ट्रकची भीषण धडक, अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 15 जखमी
यमुना एक्सप्रेसवेवर व्होल्वो बस अन् ट्रकची भीषण धडक, अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 15 जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAABP Majha Headlines :  9  AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKarveer Kolhapur Voting :  कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघात राज्यात सर्वाधिक मतदानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Dhananjay Munde: धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा टक्का वाढला, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?
राज्यात मतदानाचा टक्का वाढला; विधानसभेची अंतिम टक्केवारी समोर, कोणाच्या पारड्यात सर्वाधिक मतं?
Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेसवेवर व्होल्वो बस अन् ट्रकची भीषण धडक, अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 15 जखमी
यमुना एक्सप्रेसवेवर व्होल्वो बस अन् ट्रकची भीषण धडक, अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 15 जखमी
Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Embed widget