Oppo Find X7 Ultra Price : दोन पेरिस्कोप कॅमेरे असलेला जगातील पहिला फोन लाँच, किंमत किती?
Oppo Find X7 Ultra Price : चिनी मोबाइल निर्माता कंपनी ओप्पोने Oppo Find X7 Ultra स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. हा जगातील पहिला असा फोन आहे, ज्यामध्ये कंपनीने 2 पेरिस्कोप कॅमेरे दिले आहेत.
Oppo Find X7 Ultra Price : चिनी (China) मोबाइल निर्माता (Mobile Company) कंपनी ओप्पोने Oppo Find X7 Ultra स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. हा जगातील पहिला असा फोन आहे ज्यामध्ये कंपनीने 2 पेरिस्कोप कॅमेरे दिले आहेत. तसेच या स्मार्टफोनमध्ये जगातील सर्वात मोठा टेलिफोटो सेन्सर असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. मोबाइल फोनमध्ये क्वॉलकॉमची लेटेस्ट चिप देण्यात आली आहे. या फोनची किंमत किती आहे? चला तर मग जाणून घेऊया...
किंमत किती असेल?
सध्या कंपनीने हा फोन फक्त चीनमध्ये लाँच केला आहे. भारतात हा फोन लाँच होणार की नाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ओप्पो फाइंड एक्स 7 अल्ट्रा कंपनीने 12/256G, 16/256GB आणि16/512GB अशा 3 स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. मोबाइल फोनची किंमत अनुक्रमे 5,999 युआन (सुमारे 71,300 रुपये), 6,499 युआन (सुमारे 77,300 रुपये) आणि 6,999 युआन (सुमारे 83,215 रुपये) आहे.
स्पेसिफिकेशन्स काय असतील?
स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये क्यूएचडी प्लस रिझोल्यूशनसह 120 हर्ट्झ सपोर्ट करणारी 6.82 इंचाची LTPO OLED स्क्रीन QHD आहे. स्क्रीन 4,500 निट्सच्या पीक ब्राइटनेससह येते. या स्मार्टफोनमध्ये 100 W फास्ट चार्जिंग आणि 50 W वायरलेस चार्जिंगसह 5000 एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ओप्पोचा हा फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसरवर काम करतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP Sony LYT-900 सेन्सर, 50 एमपी अल्ट्रावाइड लेन्स, OIS सह 50 एमपी 3 एक्स टेलिफोटो लेन्स आणि 50 एमपी 6 एक्स पेरिस्कोप लेन्ससह क्वाड कॅमेरा सेटअप आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 आधारित ओप्पोच्या Color OS वर काम करतो. यात ब्लूटूथ 5.4, एनएफसी आणि वायफाय 7 फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
Moto G 34 5G आज होणार लाँच
त्यासोबतच मोटोरोला आज दुपारी 12 वाजता आपला बजेट स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. यात तुम्हाला 5000 एमएएचची बॅटरी आणि 50 एमपीचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. हा स्मार्टफोन 2 स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल, ज्याची किंमत 10,999 रुपये आणि 12,999 रुपये असू शकते.
Moto G 34 5G मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फ्रंटमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, डॉल्बी अॅटमॉससह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आणि आयपी 52-रेटेड बिल्ड चा समावेश आहे. फोनमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी असून 18 W फास्ट चार्जिंगसपोर्ट देण्यात आला आहे.
महत्वाच्या इतर बातम्या-
MicroSoft : 28 वर्षांनंतर विंडोजमधून हे अॅप्लिकेशन हटवणार , आता या 2 अॅप्सवर होणार काम