एक्स्प्लोर

10 हजारांच्या आत 5G फोन घ्यायचाय? 128 जीबीचं स्टोरेज असणारा स्वस्तात मस्त फोन

Lava Yuva 5G launched in India : आघाडीच्या भारतीय स्मार्टफोन ब्रँड असलेल्या लावा इंटरनॅशनल लिमिटेडने अफाट वेग आणि कामगिरी देऊ करण्यासाठी  पॉवर पॅक युवा ५जी बाजारात उतरवत असल्याचे जाहीर केले.

Lava Yuva 5G launched in India : आघाडीच्या भारतीय स्मार्टफोन ब्रँड असलेल्या लावा इंटरनॅशनल लिमिटेडने अफाट वेग आणि कामगिरी देऊ करण्यासाठी  पॉवर पॅक युवा ५जी बाजारात उतरवत असल्याचे जाहीर केले. दोन मेमरी प्रकार असणारा  युवा ५जी हा  वाढीव बॅटरी बॅकअप, अफाट वेग आणि दर्जेदार कॅमेरा वैशिष्ट्यांसह संपूर्ण  दिवसभर तुमच्या सोबत असणार आहे. भारतीय मूल्यात रु.  ९४९९ (६४ जीबी) आणि भारतीय मूल्यात रु. ९९९९ (१२८ जीबी) किंमत असणारा लावा ५जी हा ५ जून २०२४ पासून अॅमेझॉन, लावा ई-स्टोअर आणि लावा रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. ( Lava Yuva 5G launched in India, price starts at Rs 9,499)

फिचर्स काय आहेत ?

आजच्या तरूण पिढीसाठी डिझाईन करण्यात आलेला युवा ५जी मॅट फिनिशसह प्रीमिअम स्लीक लुक आणि २ अतिशय आकर्षक अशा मिस्टिक ब्ल्यू आणि मिस्टिक ग्रीन रंगात श्रीमंती थाटात उपलब्ध आहे.  हा ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन उत्कृष्ट ग्लास बॅंक डिझाईन, साईड फिंगरप्रिंट सेन्सर, ४जीबी+४जीबी (आभासी) रॅम आणि पिक्चर्स, व्हिडीओज तसेच मोठ्या फाईल्ससाठी उच्च क्षमतेच्या 64/128 युएफएस 2. 2 रोमसह उपलब्ध आहे.  50 एमपी एआय ड्युअल रिअर  कॅमेरा आणि ८ एमपी सेल्फी कॅमेरा निसर्गाच्या आणि स्वत:च्या उत्कृष्ट फोटोंची हमी घेतो. फोनच्या खालच्या भागात असणारे फायरिंग स्पीकर आणि सी टाईप युएसबी केबल असणारा १८ वॅ. फास्ट चार्जिंग ही याची विशेष वैशिष्ट्ये आहेत.  कोणत्याही जाहिराती नसलेला, ब्लोटवेअर नसलेला आणि फेस अनलॉक सुविधा असणारा क्लीन अॅन्ड्रॉईड १३, हे ग्राहकांना वाढीव अनुभव देण्यासाठी वचनबद्द असलेल्या लावा युवा ५जीचे वैशिष्ट्य आहे. २ वर्षांची सुरक्षितता अपडेटची हमी आणि अॅन्ड्रॉईड १४ वर अपग्रेड करण्याची सुविधा यात आहे.  या खेरीज, लावाकडून हँडसेटवर १ वर्षांची आणि अॅक्सेसरीजवर ६ महिन्यांची वॉरन्टीही देण्यात आली आहे.

लावा इंटरनॅशनल लिमिटेडचे मार्केटिंग हेड- पुरवंश मैत्रेय म्हणाले, “लावा ग्राहकांचा प्रवास हा आमच्या व्यवसाय नैतिकतेचा एक अविभाज्य भाग आहे. नव्या कल्पना, किंमत, दर्जेदार उत्पादने आणि सेवेच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना काहीतरी चांगले देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. तरुणांची स्मार्टफोन वापरण्याच्या पद्धती आणि प्राधान्य लक्षात घेऊन युवा ५जी ची रचना करण्यात आली आहे.  यातील पॉवर पॅक वैशिष्ट्ये संपूर्ण सुरक्षा आणि खात्रीशीर अपडेटचा अखंड अनुभव देतात.”     

लावा इंटरनॅशनल लिमिटेडचे प्रॉडक्ट हेड सुमित सिंग म्हणाले, “नव्या कल्पना आणि उत्कृष्टता हे आमचे उत्पादन प्रवासातील कळीचे मुद्दे आहेत.  परवडणाऱ्या किंमतीमध्ये गतिमान कामगिरी आणि नव्या काळातील स्मार्टफोन वैशिष्ट्ये देऊन आमच्या ग्राहकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने युवा ५जी ची रचना करण्यात आली आहे.  ऑक्टा-कोर प्रोसेसर, ड्युअल एआय कॅमेरा आणि जलद चार्जिंग अशा वैशिष्ट्यांनी युक्त असणारा युवा ५जी या विभागात नवीन मापदंड प्रस्थापित करून आपल्या वापरकर्त्यांसाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आणि सृजनशीलता घेऊन येत आहे.”

महत्त्वाच्या बातम्या

Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget