Reliance JioBook 4G Launch : रिलायन्स रिटेलने नवीन JioBook 4G बाजारात आणला आहे. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे JioBook मध्ये स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम असून ती JioOS वर आधारित आहे. हे जियोबुक प्रत्येक वयोगटासाठी उपयुक्त आहे. त्याची किंमत 16,499 पासून सुरू आहे. 5 ऑगस्टपासून याची खरेदी करता येणार असून ही खरेदी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीनेही करता येऊ शकेल. नव्या JioBook मध्ये मॅट फिनिश, अल्ट्रा स्लिम बिल्ट आणि हलके वजन (990 ग्रॅम) सह स्टाइलिश डिझाइन आहे.
JioBook 4G ची रचना स्लिम असूनही उत्तम आउटपुट देते. यात 2.0 GHz ऑक्टा कोर प्रोसेसर, 4 GB LPDDR4 RAM, 64 GB (SD कार्डसह 256 GB पर्यंत वाढवता येणारे) स्टोरेज, इन्फिनिटी कीबोर्ड, मोठा मल्टी-जेश्चर ट्रॅकपॅड आणि इन-बिल्ट USB/HDMI पोर्ट आहे. JioBook रिलायन्स डिजिटल वरून ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करता येते. तसेच Amazon.in द्वारे देखील खरेदी करू शकता.
असे असेल JioBook
- आधुनिक ऑपरेटिंग सिस्टम - JioOS
- 4G आणि ड्युअल-बँड वायफाय कनेक्टिव्हिटी
- अल्ट्रा स्लिम, सुपर लाइट (990 ग्रॅम) आणि आधुनिक डिझाइन
- स्मूथ मल्टीटास्किंगसाठी पॉवरफूल ऑक्टा-कोर चिपसेट
- 11.6 इंच (29.46 सेमी) अँटी-ग्लेअर HD डिस्प्ले
इन्फिनिटी कीबोर्ड आणि मोठा मल्टी-जेश्चर ट्रॅकपॅड
- यूएसबी, एचडीएमआय आणि ऑडिओ सारखे इनबिल्ट पोर्ट
JioOS ची वैशिष्ट्ये
- 4G-LTE आणि ड्युअल-बँड वायफाय क्षमता
- देशातील दुर्गम भागातही इंटरनेट सुविधा उपलब्ध असण्याची क्षमता
- सोपा इंटरफेस
- 75+ कीबोर्ड शॉर्टकट
- ट्रॅकपॅड जेश्चर
- स्क्रीन विस्तार
- वायरलेस प्रिंटिंग
- मल्टी-टास्किंग स्क्रीन
- एकात्मिक चॅटबॉट
- जिओ टीव्ही अॅपद्वारे शैक्षणिक सामग्रीमध्ये प्रवेश
- JioCloudGames सह लिडिंग गेमिंग टायटल्स
- C/C++, Java, Python आणि Perl सारख्या विविध भाषांमध्ये JioBIAN रेडी कोडिंगसह, विद्यार्थी सहजपणे कोडिंग शिकू शकतात.
जिओबुकचे फायदे
JioBook 4G मध्ये इन्फिनिटी कीबोर्ड, स्टिरीओ वेबकॅमसह वेबकॅम, वायरलेस प्रिंटिंग, ऑक्टाकोर परफॉर्मन्स, अँटी ग्लेअर एचडी डिस्प्ले, डिजीबॉक्ससह 100GB मोफत क्लाउड सेवा एका वर्षासाठी आणि क्विक हील अँटीव्हायरस संरक्षण एक वर्षासाठी उपलब्ध आहे.