iPhone 14 Discount : अॅपल कंपनीने नुकतंच एका नवीन व्हेरियंटचा आयफोन लाँच केला आहे. अॅपलने लाँच केलेला हा नवीन व्हेरियंटचा मोबाईल फोन अत्यंत आकर्षक रंगात सादर केला असून यलो व्हेरियंटमध्ये फोन उपलब्ध असणार आहे. हा अॅपलचा iPhone 14 मोबाईल फोन असून त्यांच्या बेबसाईटवर फोनची मूळ किंमत जास्त असली तरीही फ्लिपकार्ट या ऑनलाईन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या बेबसाईटवर बंपर सूट देत आहे. ही सूट किती काळासाठी असणार आहे याबाबत स्पष्टता नाही. पण फ्लिपकार्टच्या ग्राहकांसाठी ही गुड न्यूज असणार आहे. या नवीन व्हेरियंटच्या माबाईल फोनच्या फिचर्स आणि फ्लिपकार्टच्या ग्राहकांना मिळणाऱ्या बंपर ऑफरबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.
फ्लिपकार्टच्या ग्राहकांसाठी (flipkart customer) बंपर सूट
iPhone 14 च्या यलो व्हेरियंटवर फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग बेबसाईटवर बंपर सूट उपलब्ध असून त्यामध्ये 128 GB चा स्टोरेज मिळणार आहे. या मोबाईफोनची मूळ किमत 79,999 रूपये असून फ्लिपकार्टने 71,999 रूपये अशी किमत निश्चित केली आहे. जर तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल आणि HDFC च्या एटीएम कार्डवरून हा मोबाईल खरेदी केली तर ग्राहकांना 4,000 रूपये इतकी अधिक सूट मिळणार आहे. त्यामुळे अॅपलच्या चाहत्यांना फ्लिपकार्टवरून 8,000 रूपये आणि HDFC बँकेच्या कार्डवरून पेमेंट केला तर 4,000 रूपये अशी एकूण 12,000 रूपयांची बचत होऊ शकते. iPhone 14 यलो व्हेरियंटची किंमत अॅपलच्या बेबसाईटवर महाग असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे तुम्ही जर अॅपलचे चाहते असाल तर या बंपर ऑफरचा लाभ मिळवू शकता.
अॅक्सिस बँकेचे कार्ड असेल तर मिळणार ही सूट
जर तुम्हाला हा मोबाईल खरेदी करायचा आहे आणि तुमच्याकडे HDFC बँकेचे कार्ड नसेल तरीही काळजी करण्याचं काही कारण नाही. कारण फ्लिपकार्टकडून अॅक्सिक बँकेचे कार्ड उपलब्ध असणाऱ्या ग्राहकांना 5 टक्क्यांची सूट मिळत आहे. त्यासाठी तुम्हाला अॅक्सिक बँकेच्या कार्डवरून iPhone 14 चा येलो व्हेरियंट मोबाईल फोन विकत घ्यावा लागणार आहे. यासोबत अॅपलच्या ग्राहकांना एक्सचेंज ऑफरचा पर्याय देण्यात आला आहे. त्यासाठी तुम्ही जुना मोबाईल फोन
एक्सचेंज करून 30,000 रूपये पर्यंतची बचत करू शकणार आहात. किमतीतील अशा वेगवेगळ्या ऑफर्सचा पर्याय अॅपलच्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे ही ऑफर संपण्याआधी घाई करावी.
तसेच अॅपल व्यतिरिक्त सॅमसंगच्या ग्राहकांनाही बंपर सूट मिळत आहे. ही सूट अॅमेझॉन (amazone) या शॉपिंग वेबसाईटवर Samsung Galaxy S21 FE 5G या स्मार्टफोनवर उपलब्ध असणार आहे. या मोबाईल फोनची मूळ किमत 75,000 हजार रूपये इतकी असून अॅमेझॉनवरून खरेदी केली तर चक्क 53 टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना फोन 35,000 हजार रूपयांत उपलब्ध होणार आहे. यासोबक एक्सचेंज ऑफरचा पर्यायही ग्राहकांसाठी उपलब्ध असल्याचं समजतं. त्यामुळे मोबाईल फोनच्या चाहत्यांसाठी ही बंपर सूट असणार आहे, हे नक्की आहे.