एक्स्प्लोर

Google Maps Update : आता सरकारला नाही कळणार तुमचं लोकेशन, गुगल मॅपमध्ये होणार 'हा' बदल

Google Maps Update : जगभरातील कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सी जिओफेन्स वॉरंटचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. यामुळे गुगल मॅपमध्येही बदल करण्यासाठी सांगण्यात येत होतं.

मुंबई : गुगल (Google) आपल्या युजर्सच्या गोपनीयतेसाठी महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. यासाठी गुगल मॅप्समध्ये (Google Maps) एक अपडेट केले जाणार आहे. ज्यामुळे तुमची गोपनीयता आणखी वाढण्यास मदत होईल. तसेच सरकारला देखील तुमचे लोकेशन कळू शकणार नाही. गुगल मॅपमध्ये सध्या येणाऱ्या या अपडेटविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

युजर्सची प्रायव्हसी वाढवण्यासाठी प्रयत्न

गुगलने नुकत्याच केलेल्या एका घोषणेमध्ये या अपडेटची माहिती दिली. गुगलच्या म्हणण्यानुसार, मॅप्स सेवेच्या या अपडेटनंतर, गुगल मॅप्सची लोकेशन हिस्ट्री अधिकार्‍यांना म्हणजे पोलीस इत्यादी कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांना उपलब्ध होणार नाही. गुगलच्या या अपडेटकडे कायद्याची  अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना हस्तक्षेपला आळा घालण्यासाठी आणि वापरकर्त्यांची गोपनीयता वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 

3 महिन्यांचा डेटा होणार स्टोर

गुगल मॅप्सच्या लोकेशन हिस्ट्रीला टाइमलाइन म्हणून ओळखला जाते. सध्या ते क्लाउडवर साठवले आहे. यासंदर्भात गुगलने आपली धोरणे बदलली आहेत. बदलानंतर, वापरकर्त्यांना त्यांची लोकेशन हिस्ट्री म्हणजेच टाइमलाइन क्लाउडवर स्टोअर करण्याऐवजी डिव्हाइसमध्येच स्टोअर करण्याची सुविधा मिळेल. यासोबतच गुगल डेटा रिटेन्शन पॉलिसीमध्येही बदल करत आहे. या अंतर्गत डेटा ठेवण्याचा कालावधी कमी केला जात आहे. बदलानंतर, Google मॅपचा डेटा केवळ तीन महिन्यांसाठी संग्रहित केला जाईल.

निवडक लोकेशन करता येणार डिलीट

याशिवाय गुगलच्या मॅप्स सेवेतील आणखी एक मोठा बदल म्हणजे निवडक डेटा डिलीट करण्याची सुविधा. आता गुगल आपल्या वापरकर्त्यांना विशिष्ट स्थानाशी संबंधित इतिहास हटविण्याची सुविधा देखील देईल. गुगल आधीच लोकेशन सक्षम-अक्षम करण्याची सुविधा देत आहे. आता वापरकर्ते लोकेशन सर्व्हिस चालू ठेवल्यानंतरही ती पूर्णपणे नियंत्रित करू शकतील. हे वापरकर्त्यावर अवलंबून असेल की त्याला त्याचा डेटा किती प्रमाणात साठवायचा आहे.

नव्या वर्षात मिळणार नवे अपडेट

Google चे हे अपडेट लवकरच Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. गुगलचे हे मॅप अपडेट पुढील वर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे. जिओफेन्स वॉरंटच्या वाढत्या गैरवापरामुळे असा बदल करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.जगभरातील अधिकारी जिओफेन्स वॉरंटद्वारे लोकांच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप कर आहेत, त्यामुळे ही मागणी वारंवार केली जात होती. गुगलने अखेर याची अंमलबजावणी केली आहे.

हेही वाचा : 

Iphone Use Ban In Chin : चीनमध्ये आयफोनवर बंदी! नेमकं कारण काय? सरकारी कर्मचाऱ्यांना iPhone वापरण्यावर बंदी!

महत्त्वाच्या बातम्या

जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget