Election Commission of India : निवडणुकांपूर्वीच निवडणूक आयोगाकडून 27 ॲप्स आणि पोर्टल लॉन्च; मतदारांना मिळतील अनेक सुविधा
Election Commission of India : भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर केल्या आणि या दरम्यान आयोगाने 27 ॲप्स आणि वेब पोर्टल्स देखील लॉन्च केले आहेत.
Election Commission of India : नुकत्याच (16 मार्च 2024) रोजी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा म्हणजेच 19 एप्रिल ते 1 जून या दरम्यान निवडणुका जाहीर केल्या आहेत. या दरम्यान ECI ने सांगितले की ते या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) टेक्नॉलॉजीचा कसा फायदा घेतील .
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी घोषणा केली आहे की समिती मतदान प्रक्रिया लोकांसाठी सोयीस्कर बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी 27 ॲप्स आणि पोर्टल्स सादर केले जात आहेत.
ECI कडून पोर्टल आणि ॲप लाँच
ECI ने व्होटर्स हेल्पलाईन (VHA) ॲप जाहीर केले आहे जे मतदान केंद्राचे तपशील पाहणे आणि ऑनलाइन फॉर्मसाठी अर्ज करणे सोपे करेल. हे मतदारांना त्यांच्या बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) आणि इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर्स (ERO) यांच्याशी जोडण्यात मदत करेल. यामुळे मतदारांना त्यांचे e-EPIC (इलेक्ट्रॉनिक फोटो ओळखपत्र) डाउनलोड करता येणार आहे. व्होटर हेल्पलाईन ॲप आता गुगल प्ले स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
cVigil ॲपचं नाव काय आहे?
याशिवाय, भारतीय निवडणूक आयोगाने cVigil नावाचे ॲप देखील लाँच केले आहे, जे नागरिकांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आणि निधीच्या वापराची तक्रार करण्याची सुविधा प्रदान करेल. कोणत्याही उल्लंघनाचे रेकॉर्डिंग, अहवाल आणि निराकरण करण्यासाठी हे एकमेव ॲप आहे.
हे यूजर्सना 100 मिनिटांची प्रतिसाद टाईमलाईन देते. त्याची खास गोष्ट म्हणजे ती कोणत्याही व्यक्तीने केलेली तक्रार पूर्णपणे गुप्त ठेवते. cVigil ॲप Google Play Store वरून देखील डाउनलोड केले जाऊ शकते.
केवायसी पोर्टलचे कार्य काय असेल?
याशिवाय मतदारांच्या सोयीसाठी ECI ने KYC पोर्टल देखील सुरू केलं आहे. या पोर्टलवर, मतदारांना त्यांच्या उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र आणि त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड यांसारख्या गोष्टींचा संपूर्ण तपशील पाहता येईल. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सर्व राजकीय पक्षांना त्यांची सर्व माहिती अशा सर्व पोर्टल्स आणि ॲप्सवर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.
Leveraging technology!#ECI offers 27 apps & portals for all stakeholders. cVigil empowers citizens to report MCC violations & assured action within 100 mts. KYC app facilitates informed voting. A revamped results portal to enhance the experience on results day. #Elections2024 pic.twitter.com/QaYV04EAVF
— Election Commission of India (@ECISVEEP) March 16, 2024
मतदारांसाठी सर्व माहिती पारदर्शक व्हावी हा या पोर्टलचा उद्देश आहे. याशिवाय, समितीने सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुविधा पोर्टलही सुरू केले आहे. उमेदवार कोणत्याही सभा, रॅली इत्यादीसाठी परवानगी घेण्यासाठी या पोर्टलचा वापर करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :