Apple iPhone sale in India : भारतात दिवसागणिक वाढतेय आयफोनची मागणी, शेवटच्या तिमाहीत ॲपलने केली विक्रमी विक्री, सीईओ टीम कूक यांची माहिती
Apple iPhone sale in India : ॲपलसाठी भारत एक प्रमुख बाजारपेठ बनत आहे. कंपनीने गेल्या वर्षीच भारतात दोन नवीन स्टोअर लाँच केले आहेत.
मुंबई : आयफोनच्या (Iphone) लोकप्रियतेमध्ये दिवसागणिक वाढ होत चालल्याचं चित्र पाहायला मिळतंय. एक काळ असा होता की, मोठे व्यावसायिक आणि श्रीमंतांची ओळख हा आयफोन झाला होता. पण आता अगदी सर्वसामान्यांकडे देखील आयफोन आपल्याला पाहायला मिळतो. याचमुळे हा फोन आणि कंपनी सर्व लोकापर्यंत पोहचली आहे. त्याचा परिणाम आयफोनच्या विक्रीवर देखील पाहायला मिळतो. तसेच भारतातही ॲपलचा मार्केट शेअर झपाट्याने वाढत आहे.
ॲपलसाठी भारत एक प्रमुख बाजारपेठ बनत चालल्याचं चित्र आहे. मागील वर्षी भारतात अॅपलने त्यांचे दोन नवीन स्टोअर देखील लॉन्च केले आहेत. त्यामुळे मागील वर्षाच्या शेवटच्या तिमाहीबद्दल बोलायचे तर कंपनीने 2022 च्या तुलनेत यंदाच्या वर्षात ग्रोथ रेटमध्ये 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अॅपलच्या या आठवड्यात अॅलपचा जो क्वार्टरली अर्निंग कॉल झाला त्यामध्ये अॅपलचे सीईओ टीम कूक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
आयफोनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
आयफोनला व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवरील ग्राहकांमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे भारतात ॲपलचा व्यवसाय झपाट्याने वाढत चालल्याचं चित्र आहे. कंपनीने सप्टेंबर-डिसेंबर तिमाहीत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनीही याचा उल्लेख केला. क्वार्टरली अर्निंग कॉलमध्ये अॅपलचे सीईओ म्हणाले की, भारताच्या रेव्हेन्यूमध्ये बरीच वाढ झाली आहे. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीची वाढ दुहेरी अंकात आहे आणि या तिमाहीत विक्रमी रेव्हेन्यू मिळवला आहे.
आयफोनची वाढती मागणी
भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेतील एकूण विक्रीबद्दल बोलायचे तर,एंट्री लेव्हल आणि मिड सेगमेंट स्मार्टफोन्सचे वर्चस्व सध्या पाहायला मिळत आहे. तसेच आयफोनच्या शिपमेंटमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणे युजर्समध्ये लक्षणीय बदल झाला आहे. त्यामुळे भारतीयांकडून आयफोनच्या मागणीत वाढ होत चाललाय.
लेटेस्ट क्वार्टरमध्ये iPhone 15 च्या सरिजला सर्वाधिक पसंती मिळाली असल्याचं पाहायला मिळालं आहे. विक्रीमध्ये 45 टक्के बाजारपेठ ही आयफोन 15 सिरिजची आहे. तसेच या सिरिजची स्पर्धा ही आयफोन 14 सिरिजशी आहे. त्याचप्रमाणे आयफोन 13 सिरिजची विक्री 21 टक्के झाली आहे. तिन्ही सिरिजमध्ये iPhone 15 च्या सिरिजचे सर्वाधिक युनिट्स विकले गेले आहेत.
यामुळे भारतीय जुन्या आयफोनच्या सिरिजपेक्षा आयफोनच्या न्या सिरीजला जास्त पसंती देत असल्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणे सणासुदीच्या ऑफर्स आणि दिवाळीमध्ये मिळालेल्या ऑफर्स यामुळे विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत ७ टक्के वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
ही बातमी वाचा :
iPhone Upcoming Feature : Apple ची मोठी तयारी! लवकरच आयफोनवर मिळणार AI फिचर