एक्स्प्लोर
World Cup 2019 | सुपरफास्ट विराट, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावे 18426 तर सौरव गांगुलीच्या नावे 11221 धावा आहेत. आता दिग्गजांच्या पंक्तीत विराटने जागा मिळवली आहे.
लंडन : विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रेफेर्ड मैदानात सुरु आहे. आजच्या सामन्यात भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहलीने महत्त्वपूर्ण खेळी केली. विराटने आजच्या सामन्यात अर्धशतकीय खेळी केली आणि एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला.
विराटने आजच्या सामन्यात एकदिवसीय 11 हजार धावांचा टप्पा पार केला. विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. विराटने सर्वात कमी डावांमध्ये 11 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
विराटने अवघ्या 222 डावांमध्ये 11 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. तर सचिनने ही कामगिरी करण्यासाठी 276 डावांत केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 धावांचा टप्पा पार करणारा विराट तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी ही कामगिरी केली आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावे 18426 तर सौरव गांगुलीच्या नावे 11221 धावा आहेत. आता दिग्गजांच्या पंक्तीत विराटने जागा मिळवली आहे.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement