एक्स्प्लोर

इंग्लंडच्या 481 धावांचा पाठलाग करताना कांगारुंना फेस, अख्खा संघ 239 धावांत गारद

नॉटिंगहॅम वन डेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा तब्बल 242 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धची 5 सामन्यांची वन डे मालिका 3-0 अशी खिशात टाकली.

नॉटिंगहॅम: वन डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च 481 धावांची नोंद केलेल्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा तब्बल 242 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धची 5 सामन्यांची वन डे मालिका 3-0 अशी खिशात टाकली. नॉटिंगहॅम वन डेत प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या अक्षरश: चिंधड्या उडवत, 50 षटकात 6 बाद 481 धावांच्या विश्वविक्रमाची नोंद केली. हे बलाढ्य लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेली कांगारु टीम अवघ्या 239 धावात गुंडाळली. ऑस्ट्रेलियन संघाला 50 षटकंही खेळता आली नाहीत. त्यांचे सर्व फलंदाज अवघ्या 37 षटकातंच माघारी परतले. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ट्रेविस हेडने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर इंग्लंडकडून अदिल रशीदने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. इंग्लंडची विक्रमी धावसंख्या इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नॉटिंगहॅम वन डेत सहा बाद 481धावांची मजल मारून, वन डे क्रिकेटमधल्या सर्वाधिक धावांच्या विश्वविक्रमाची नोंद केली. वन डे क्रिकेटमधला याआधीचा उच्चांक इंग्लंडच्याच नावावर होता. 2016 साली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडनं तीन बाद 444 धावांची मजल मारली होती. मात्र कालच्या सामन्यात इंग्लंडनं स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. सलामीला उतरलेल्या बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी पहिल्या विकेटसाठी 19.3 षटकांमध्येच 159 धावांची भागीदारी केली. 61 चेंडूत 82 धावांवर जेसन रॉय धावबाद झाला. मात्र त्याच्या या वेगवान खेळीला पुढे नेण्यासाठी बेअरस्टोला हेल्सने साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 151 धावांची भागीदारी करत 35 षटकांमध्येच 300 धावांची मजल मारुन दिली. अॅश्टन एगरच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी बेअरस्टोने 92 चेंडूत 15 चौकार आणि पाच षटकारांनी त्याची खेळी सजवली होती. बेअरस्टोनंतर बटलर (11) स्वस्तात माघारी परतला. मात्र त्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन मैदानात उतरला. येताच त्याने धमाका सुरु केला. 43 धावांवर पोहोचताच मॉर्गन इंग्लंडचा वन डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने सध्या संघातून बाहेर असलेल्या इयान बेलच्या 5416 धावांना मागे टाकलं. पहिला विक्रम मोडताच मॉर्गनची नजर दुसऱ्या विक्रमावर होती. त्याने 21 चेंडूतच अर्धशतक पूर्ण करत इंग्लंडचा सर्वाधिक जलद अर्धशतक ठोकणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. मॉर्गन आणि हेल्सने चौथ्या विकेटसाठी 10 षटकात 124 धावा ठोकल्या. या सामन्यात झालेले विक्रम वन डेतील सर्वाधिक धावसंख्या - इंग्लंड 481/6 इंग्लंडकडून वेगवान अर्धशतक - इयॉन मॉर्गन - 21 चेंडूत 50 धावा इंग्लंडकडून सर्वाधिक धावसंख्या करणारा फलंदाज- इयॉन मॉर्गन ऑस्ट्रेलियाची पराभवाची मालिका या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिका 0-3 ने गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने गमावलेली ही सलग पाचवी मालिका आहे. तर इंग्लंडविरुद्धच्या 9 पैकी 8 वन डे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आहे. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियाने विविध संघांशी खेळलेल्या शेवटच्या 16 वन डे सामन्यांमध्ये केवळ 2 सामन्यातच त्यांना विजय मिळवता आला आहे. संबंधित बातम्या  इंग्लंडची वन डे क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात मोठी धावसंख्या 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana News : टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
Kuldeep Yadav Wedding : मेंहदी रंगली, हळद लागली! कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, टीम इंडियाचे स्टार्स एकत्र, कोण-कोण आलं? पाहा VIDEO
मेंहदी रंगली, हळद लागली! कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, टीम इंडियाचे स्टार्स एकत्र, कोण-कोण आलं? पाहा VIDEO
Ban vs Pak 2nd ODI : पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात चिडाचिडी अन् रडारडी, कधीही न पाहिलेला रनआऊट VIDEO
पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात चिडाचिडी अन् रडारडी, कधीही न पाहिलेला रनआऊट VIDEO
Blessing Muzarabani News : आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये धुमाकूळ घालणार पठ्ठ्या
आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये धुमाकूळ घालणार पठ्ठ्या

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण कायम, गुंतवणूकदारांना फटका, बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत, LIC चेही नुकसान
SBI च्या शेअरमधील घसरण थांबेना, बाजारमूल्य घटलं, एका दिवसात 30 हजार कोटींचा फटका, LIC चेही नुकसान
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार? नेमकं काय घडलं? 
ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार?
Embed widget