एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

World Cup 2023 MS Dhoni Prediction : यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार, सर्वात यशस्वी कर्णधार धोनीचं सर्वात मोठं भाकीत!

World Cup 2023 MS Dhoni Prediction : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) यंदाच्या विश्वचषकाबाबत सर्वात मोठी भविष्यवाणी वर्तवली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात भारतीय संघाने सलग पाच सामने जिंकले. त्यामुळेच धोनीने विश्वचषकाबाबत आपला अंदाज वर्तवला आहे. 

Team India in World Cup 2023: यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप (Cricket World Cup 2023) कोण जिंकणार याबाबत अनेकजण अंदाज वर्तवत आहेत. त्यातच टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) यंदाच्या विश्वचषकाबाबत सर्वात मोठी भविष्यवाणी वर्तवली. टीम इंडिया यंदा तुफान फॉर्ममध्ये आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात भारतीय संघाने सलग पाच सामने जिंकले. त्यामुळेच धोनीने विश्वचषकाबाबत आपला अंदाज वर्तवला आहे. 

World Cup 2023 India Performance : टीम इंडियाची धडाकेबाज कामगिरी 

टीम इंडियाने यंदाच्या विश्वचषकात (ODI World Cup 2023) धडाकेबाज कामगिरी केली. भारताने सर्वात आधी ऑस्ट्रेलिया, मग पाकिस्तान, अफगाणिस्तानला हरवलं. त्यानंतर बांगलादेश आणि न्यूझीलंडला टीम इंडियाने पाणी पाजत पाचव्या विजयाची नोंद केली. भारताच्या या विजयी मालिकेनंतर धोनीने भविष्यवाणी केली. 

World Cup 2023 Team India : टीम इंडिया समतोल

धोनीने सध्याच्या टीम इंडियाला बॅलन्स्ड अर्थात समतोल म्हटलं आहे. धोनी म्हणाला, "भारताची सध्याची टीम उत्तम आहे. संघाचा समतोल जबरदस्त आहे. सर्वजण उत्तम कामगिरी करत आहेत. विजेता कोण होणार याबाबत मी जास्त काही बोलू शकत नाही. समजने वालों को इशारा काफी है" असं धोनीने नमूद केलं. 

धोनीच्याच नेतृत्त्वात टीम इंडियाने 2011 चा वर्ल्डकप जिंकला होता. त्याशिवाय 2007 मध्ये पहिला टी 20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियाने धोनीच्याच नेतृत्त्वात केला होता.  

World Cup 2023 Rohit Sharma Team : रोहित शर्माची कसोटी

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. विश्वचषकात भारताचा आगामी सामना रविवारी 29 ऑक्टोबरला इंग्लंडसोबत आहे. इंग्लंडने आतापर्यंत 5 पैकी 4 सामने गमावले आहेत. 

World Cup 2023 MS Dhoni Prediction : धोनी आयपीएलमध्ये खेळणार? 

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हा तीन तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या जगातील मोजक्या कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्याच नेतृत्वात टीम इंडियाने 2007 मध्ये टी 20 विश्वचषक, 2011 मध्ये वन डे विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यावेळी धोनी IPL तरी खेळणार की नाही अशी चर्चा होती. 

धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल खेळत राहिला. 2021 आणि 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचं जेतेपद पटकावलं. यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी शेवटचा खेळेल आणि त्यानंतर निवृत्त होईल, अशी शक्यता चाहत्यांना होती. त्यामुळे धोनीच्य सर्व सामन्यांना सर्वच मैदानांवर चाहत्यांची एकच गर्दी होती. आता 2024 मध्ये धोनी आयपीएल खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे. मात्र नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात धोनीने स्पष्ट केलंय की अजून तो आयपीएलपासून दूर गेलेला नाही. 

धोनीने नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीतील उत्तरांनी धोनीने धक्के दिले. मुलाखत घेणाऱ्याने धोनीचा उल्लेख निवृत्त क्रिकेटपटू असा केला. जसं की तू आता क्रिकेटमधून निवृत्त झाला आहेस, असं मुलाखतकार म्हणाला. 
 
हे ऐकताच धोनी म्हणाला, मी केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो आहे. धोनीच्या या उत्तराने तो यापुढेही आयपीएल खेळत राहणार का याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. दरम्यान, धोनी आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत येत्या डिसेंबर-जानेवारीमध्ये निर्णय घेणार आहे.  

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 2100 यंदा नाही तरी पुढील वर्षी..?Solapur Election News : EVM वर आक्षेप, बॅलेट पेपरवर निवडणूक घेणाऱ्या मारकडवाडीमध्ये जमावबंदीचे आदेश लागूABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 02 December 2024Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 3 PM : 02 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Australia vs India, 2nd Test : टीम इंडियासमोर अडचणी वाढल्या, ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का संघात परतला
टीम इंडियासमोर अडचणी वाढल्या, ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का संघात परतला
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडलं
Rishabh Pant And Shreyas Iyer Qualification : IPL इतिहासातील सर्वात महागडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कितवीपर्यंत शिकले?
IPL इतिहासातील सर्वात महागडे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर कितवीपर्यंत शिकले?
Embed widget