IND vs PAK, WT20 Live : भारताचा पाकिस्तानवर सात गड्यांनी विजय

India vs Pakistan, Women T20 WC 2023 : महिला टी 20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 12 Feb 2023 09:42 PM
ऋचा घोष आणि जेमिमा यांची विजयी भागिदारी

ऋचा घोष आणि जेमिमा यांनी चौथ्या विकेटसाठी 33 चेंडूत 58 धावांची नाबाद भागिदारी केली. या विजयासह भारताने विश्वचषकाची विजयी सुरुवात केली आहे.

जेमिमाचं दमदार अर्थशतक

मोक्याच्या क्षणी जेमिमा हिने अर्थशतकी खेळी करत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. जेमिमानं अर्धशतकी खेळीत सात चौकार लगावले. ऋचा घोष हिने जेमिमाला चांगली साथ दिली. 

भारताचा पाकिस्तानवर सात गड्यांनी विजय

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात गड्यांनी पराभव केला. 

सामना भारताच्या बाजूनं झुकला...

ऋचा घोष आणि जेमिमाच्या फटकेबाजीमुळे सामना भारताच्या बाजूने झुकला आहे. भारताला विजयासाठी 10 चेंडूत 9 धावांची गरज

ऋचा घोषची फटकेबाजी, पाकिस्तानच्या गोलंदाजांनी नांग्या टाकल्या

मोक्याच्या क्षणी ऋचा घोष हिने लागोपाठ तीन चौकार लगावत पाकिस्तानवर दबाव निर्माण केला आहे. भारताला विजयासाठी 12 चेंडूत 14 धावांची गरज

18 चेंडूत 28 धावांची गरज

सामना रोमांचक स्थितीत पोहचला आहे. भारताला विजयासाठी 18 चेंडूत 28 धावांची गरज आहे. 

सामना रोमांचक स्थितीत

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रोमांचक स्थितीत पोहचला आहे. भारताला विजयासाठी चार षटकात 41 धावांची गरज आहे. 

भारताच्या 100 धावा पूर्ण

भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात 100 धावांचा टप्पा पार केला आहे. विजयासाठी 32 चेंडूत 49 धावांची गरज आहे. 

कर्णधार हरमनप्रीत कौर बाद

हरमनप्रीत कौरच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसला आहे. हरमनप्रीत 16 धावा काढून बाद झाली आहे. भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात 94 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी 56 धावांची गरज आहे.

भारताला मोठा धक्का, कर्णधार हरमनप्रीत कौर बाद

भारताला मोठा धक्का, कर्णधार हरमनप्रीत कौर बाद

IND vs PAK, WT20 Live : भारताला दुसरा धक्का, शेफाली वर्मा बाद

यस्तिका भाटियानंतर शेफाली वर्माच्या रूपानं भारताला दुसरा धक्का बसला आहे. शेफाली 33 धावांवर बाद झाली. भारताच्या आपर्यंत 11 षटकानंतर दोन बाद 74 धावा झाल्या आहेत. 


 

सात षटकात भारताचे अर्धशतक

सात षटकात भारताने 53 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी अद्याप 97 धावांची गरज आहे. 

IND vs PAK, WT20 Live : भारताला पहिला धक्का, यस्तिका भाटिया बाद

यस्तिका भाटियाच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला आहे. यास्तिका भाटिया 17 धावा काढून बाद झाली.

भारताची वादळी सुरुवात, यस्तिका भाटियानं चौकारानं उघडलं खाते

भारताची वादळी सुरुवात, यस्तिका भाटियानं चौकारानं उघडलं खाते

149 धावांपर्यंत मजल, पाकिस्तानच्या कर्णधाराची अर्धशतकी खेळी

पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफ हिच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर पाकिस्तान संघानं 149 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताला विजयासाठी 150 धावांचं लक्ष दिलेय. 

भारताचे गचाळ क्षेत्ररक्षण

भारताच्या फिल्डर्सनी गचाळ क्षेत्ररक्षण केले. आयशा नसीम हिचे दोन झेल सोडले. 

पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफ हिचं अर्थशतक

पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफ हिने अर्धशतक झळकावलं. 

पाकिस्तानला चौथा धक्का, राधानं सिदरा अमीन हिला केलं बाद

राधानं सिदरा अमीन हिला बाद करत पाकिस्तानला चौथा धक्का दिला.  





पाकिस्तानचं अर्धशतक, कर्णधारानं डाव सांभाळला

पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफ हिने डाव सावरला आहे. बिस्माह मारूफ 28 धावांवर खेळत आहे.  पाकिस्तान दहा षटकानंतर तीन बाद 58 धावा

पाकिस्तानला तिसरा धक्का, निदा दार बाद

पाकिस्तानला तिसरा धक्का पूजा वस्त्राकार हिने दिलाय.  निदा दार खातेही न उघडता बाद झाली.. पाकिस्तानचा संघ तीन बाद 44 धावांवर आहे.





राधाचा भेदक मारा, पाकिस्तानला दुसरा धक्का

मुनीबा अलीला बाद करत राधा यादवनं भारताला दुसरं यश मिळवून दिले. पाकिस्तान संघाने सात षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात 42 दावा केल्या आहेत. पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफ  22 धावांवर खेळत आहे.

पाकिस्तानच्या कर्णधारानं डाव सांभाळला

पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफ हिने डाव सावरला आहे. पहिली विकेट झटपट पडल्यानंतर बिस्माह मारूफ हिने संयमी खेळी करत डाव सावरला. पाच षटकानंतर पाकिस्तानच्या संघाच्या 31 धावा झाल्या आहेत.

दिप्तीनं मिळवून दिलं भारताला पहिलं यश

जावेरिया खान हिला बाद करत दिप्ती शर्मानं भारताला पहिलं यश मिळवून दिलेय. सहा चेंडूत आठ धावा करत जावेरिया खान बाद झाली...  





पाकिस्तानची प्लेईंग 11

जावेरिया खान, मुनीबा अली (विकेटकीपर), बिस्माह मारूफ (कप्तान), निदा डार, सिदरा अमीन, आलिया रियाज, आयशा नसीम, ​​फातिमा सना, ऐमन अनवर, नशरा संधू, सादिया इकबाल

पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, भारताची प्रथम गोलंदाजी

India vs Pakistan Women's T20 World Cup : महिला टी 20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानची कर्णधार बिस्मा मारूफ हिने नाणेफेकीचा कौल जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाला प्रथम गोलंदाजी करावी लागणार आहे. स्मृती मंधानाच्या अनुपस्थितीत भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. 








 






भारतीय महिलांचा संघ कसा आहे?

शफाली वर्मा, यस्तिका भाटिया,  जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकिपर), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकर, राधा यादव,राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह

पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

पाकिस्तान महिला संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. भारताला गोलंदाजी करण्यास आमंत्रित करण्यात आले आहे. पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करणार

थोड्याच वेळात सुरु होणार सामना

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टज सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात 





स्मृती मंधाना दुखापतग्रस्त

पाकिस्तानविरोधातील हायहोल्टेज सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आक्रमक स्मृती मंधाना ही दुखापतग्रस्त झाली आहे, त्यामुळे पहिल्या सामन्याला तिला मुकावं लागणार आहे. याचा फटका टीम इंडियाला बसू शकतो. मंधानाने 8 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यातही भाग घेतला नव्हता. स्मृतीला ही दुखापत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाविरुद्धच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान झाली होती.

भारत-पाक हेड टू हेड

महिला भारतीय टीम आणि पाकिस्तान  यांच्यात आतापर्यंत 13 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघानं 10 सामन्यात विजय नोंदवला आहे. तर पाकिस्तानच्या संघाला तीन विजय मिळवता आलेत. आज होणाऱ्या सामन्यातही भारताचे पारडे जड मानले जातेय.  

सामना कुठे खेळला जाईल?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला टी-20 विश्वचषक सामना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाणार आहे.

कुठे पाहाल सामना?

महिला T20 विश्वचषकाचे सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकता.

सामना कधी सुरू होईल?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होईल. संध्याकाळी 6 वाजता नाणेफेक होईल.

पार्श्वभूमी

India vs Pakistan Women's T20 World Cup : महिला टी 20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना होणार आहे. दहा फेब्रुवारीपासून महिला टी 20 विश्वचषकाची सुरुवात झाली आहे, पण आजपासून भारताच्या विश्वचषक अभियानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी सहा वाजता नाणेफेक होईल, त्यानंतर साडेसहा वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ विश्वचषकाची सुरुवात विजयानं करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील. (Women T20 World Cup, IND vs PAK ) दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर सामना रंगणार आहे.  


भारत-पाक हेड टू हेड


महिला भारतीय टीम आणि पाकिस्तान  यांच्यात आतापर्यंत 13 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघानं 10 सामन्यात विजय नोंदवला आहे. तर पाकिस्तानच्या संघाला तीन विजय मिळवता आलेत. आज होणाऱ्या सामन्यातही भारताचे पारडे जड मानले जातेय.  


स्मृती मंधाना दुखापतग्रस्त -
पाकिस्तानविरोधातील हायहोल्टेज सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आक्रमक स्मृती मंधाना ही दुखापतग्रस्त झाली आहे, त्यामुळे पहिल्या सामन्याला तिला मुकावं लागणार आहे. याचा फटका टीम इंडियाला बसू शकतो. मंधानाने 8 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यातही भाग घेतला नव्हता. स्मृतीला ही दुखापत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाविरुद्धच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान झाली होती.


अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत -
महिला T20 विश्वचषकामध्ये दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तानचे (IND vs PAK) संघ ब गटात आहेत. या गटात इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजचे संघही आहेत. पाच संघांच्या या गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र असतील.  त्याचप्रमाणे अ गटातही 5 संघ असून त्यापैकी दोन संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे.


रविवारी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर 'ग्रुप ब'मधील दोन्ही संघांची लढत होणार आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सलामी सामना आहे.  भारताची धुरा हरनप्रीत कौरच्या हातात तर पाकिस्तानची धुरा बिस्मा मारूफकडे आहे. महिला T20 विश्वचषकातील शेवटच्या सातव्या स्पर्धेमध्ये भारत उपविजेता होता. अंतिम फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता.


T20 विश्वचषकात भारताचे सामने कधी-कधी होणार आहेत?



  • 12 फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान (केपटाऊन, संध्याकाळी 6.30)

  • 15 फेब्रुवारी: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (केपटाऊन, संध्याकाळी 6.30 वाजता)

  • 18 फेब्रुवारी: भारत विरुद्ध इंग्लंड (गेकेबेरा, संध्याकाळी 6.30 वाजता)

  • 20 फेब्रुवारी: भारत विरुद्ध आयर्लंड (गेकेबेरा, संध्याकाळी 6.30 वाजता)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.