एक्स्प्लोर

UAE vs NED, T20 WC : रोमहर्षक सामन्यात नेदरलँडचा युएईवर तीन विकेट्सनी विजय, अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झाला सामना

UAE vs NED, T20 WC 2022 : टी20 वर्ल्डकपला आता सुरुवात झाली असून नुकत्याच झालेल्या नेदरलँड विरुद्ध युएई सामन्यात नेदरलँडने 3 विकेट्सच्या फरकाने युएईवर रोमहर्षक असा विजय मिळवला. विशेष म्हणजे अखेरपर्यंत हा सामना चुरशीचा झाला.

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु झालेल्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात नेदरलँड संघाने युएईवर (NED vs UAE) तीन गडी राखून विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे अत्यंत चुरशीच्या आणि रंगतदार सामन्यात अखेरच्या षटकपर्यंत चुरस दिसून आली, केवळ दोन चेंडू शिल्लक असताना नेदरलँडने विजय मिळवला. ज्यामुळे युएईचं विजयाचं स्वप्न भंगलं पण नेदरलँडनं स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना युएईने नेदरलँडला विजयासाठी 112 धावांचे लक्ष्य दिले. माफक लक्ष्य असतानाही नेदरलँडचा संघ हे पूर्ण करण्यासाठी बरीच धडपड करताना दिसला, पण अखेर दोन चेंडू शिल्लक असताना विजयी धाव घेत 7 विकेट्सने नेदरलँडने विजय मिळवला.

सर्वात आधी नाणेफेक जिंकत युएई संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नेदरलँड संघाने कसून गोलंदाजी करत जास्त हात खोलण्याची संधी युएईच्या फलंदाजांना दिली नाही. सलामीवीर मुहम्मद वसीमने मात्र 41 धावांची एकहाती झुंज दिल्यामुळे संघाने 100 धावांचा आकडा ओलांडला. याशिवाय काशिफ आणि अरविंद यांनी अनुक्रमे 15 आणि 18 धावाचं योगदान दिलं. इतर खेळाडू दुहेरी संख्याही गाठू शकले नाही. ज्यामुळे अखेर 20 षटकांत 8 गडी गमावून युएईचा संघ 111 धावा करु शकला. 

अखेरच्या षटकापर्यंत रंगदार झाला सामना

ज्यानंतर नेदरलँडचा संघ 112 धावा करण्यासाठी मैदानात उतरला. विशेष म्हणजे नेदरलँडच्या एकाही फलंदाजांने लक्षणीय कामगिरी केली नाही पण सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी कसंबसं 112 धावांचं लक्ष्य गाठलं आणि 3 गडी 1 चेंडू राखून विजय मिळवला. युएईच्या संघाकडून मॅक्स ओडेवडने सर्वाधिक 23 रन केले. अगदी अखेरच्या षटकापर्यंत सामना रोमहर्षक झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 6 रन हवे असतानाही नेदरलँडला 6 धावा करण्यासाठी 5 बॉल खेळावे लागले. ज्यानंतर अखेर  पाच चेंडू खेळून 3 गडी 1 चेंडू राखून नेदरलँडचा संघ सामना जिंकला. नेदरलँडच्या बॅस डी लीडने गोलंदाजीत 3 विकेट घेतल्या तर 14 धावाही केल्या, ज्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget