Harbajan on Hardik: आज आयपीएलच्या मैदानात सनरायजर्स हैदराबाद संघासमोर गुजरात टायटन्स संघाचं आव्हान असणार आहे. गुजरात संघाने कर्णधार हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली यंदा दमदार कामगिरी केली असल्याने त्याचे सर्वचजण कौतुक करत आहेत. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह याने देखील हार्दिकवर स्तुतीसुमनं उधळत त्याच्यासारखा खेळाडू 2022 च्या टी20 विश्वचषकात भारतीय संघात असायलाच हवा असंही म्हटला आहे. स्टार स्पोर्ट्सच्या Cricket Live कार्यक्रमात बोलताना हरभजनने हे विधान केलं आहे.


यंदाची आयपीएल (IPL 2022) सुरु झाली असून यंदा 8 जागी 10 संघामध्ये सामने खेळवले जात आहेत. नव्याने सामिल झालेल्या गुजरात आणि लखनौ संघानी देखील चांगली कामगिरी सुरु ठेवली आहे. त्यात गुजरात संघाने तर आतापर्यंत खेळलेल्या तीन पैकी तीन सामने जिंकल्याने त्यांची विशेष स्तुती होत आहे. यावेळी फ्रंट फुटवर येऊन संघाचं नेतृत्त्व करणाऱ्या हार्दिकच हरभजन सिंहने कौतुक करत 2022 च्या टी20 विश्वचषकात हार्दिकसारखा खेळाडू भारतीय संघात असायला हवा असं तो म्हणाला आहे. सध्या हार्दिक गुजरात संघाची धुरा सांभाळत आहे. फलंदाजीत छाप सोडताना तो गोलंदाजी देखील करु लागल्याने ही एक दिलासादायक गोष्ट असल्याचं हरभजन म्हटला आहे. 


आगामी 2022 चा विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. त्यामुळे सध्या पार पडणाऱ्या आयपीएलसह सर्वच स्पर्धांमधून या विश्वचषकासाठीच भारतीय संघात कोणाला स्थान मिळणार हे नक्की केलं जाणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha