Rajsthan Royals : क्रिकेटचा महासंग्राम असणाऱ्या इंडियन प्रिमीयर लीगच्या (IPL 2022) 15 व्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्या 20 सामन्यात बहुतांश सामने चुरशीचे झाल्याचं दिसून आलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार संघ मुंबई, चेन्नई यांच्याकडून खास कामगिरी होत नसली तरी नव्याने सामिल झालेले गुजरात, लखनौ संघ चांगली कामगिरी करत आहेत. सद्यस्थितीला राजस्थान संघाने सर्वात दमदार कामगिरी केली असून ते गुणतालिकेत अव्वलस्थानी आहेत. विशेष म्हणजे पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपही राजस्थानच्या संघाकडेच आहे.
आयपीएलच्या वीसाव्या सामन्यात राजस्थाननं लखनौला 3 धावांनी पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाला 162 धावापर्यंत मजल मारता आली. या विजयासह राजस्थानने 4 पैकी 3 सामने जिंकत 6 गुण आणि दमदार नेट रनरेटच्या मदतीने अव्वल स्थान गाठलं आहे.
आयपीएल 2022 गुणतालिका
POS | TEAM | PLD | WIN | LOST | TIED | N/R | NET RR | PTS | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1. | राजस्थान | 4 | 3 | 1 | 0 | 0 | +0.951 | 6 | |
2. | कोलकाता | 5 | 3 | 2 | 0 | 0 | +0.446 | 6 | |
3. | गुजरात | 3 | 3 | 0 | 0 | 0 | +0.349 | 6 | |
4. | बंगळुरु | 4 | 3 | 1 | 0 | 0 | +0.294 | 6 | |
5. | लखनौ | 5 | 3 | 2 | 0 | 0 | +0.174 | 6 | |
6. | दिल्ली | 4 | 2 | 2 | 0 | 0 | +0.476 | 4 | |
7. | पंजाब | 4 | 2 | 2 | 0 | 0 | +0.152 | 4 | |
8. | हैदराबाद | 3 | 1 | 2 | 0 | 0 | -0.889 | 2 | |
9. | मुंबई | 4 | 0 | 4 | 0 | 0 | -1.181 | 0 | |
10. | चेन्नई | 4 | 0 | 4 | 0 | 0 | -1.211 | 0 |
चतूर चहलकडे पर्पल कॅप
आरसीबीची साथ सोडून राजस्थानमध्ये सामिल झालेल्या चहलने यंदाच्या आय़पीएलमध्ये दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. त्याने खेळलेल्या केवळ चार सामन्यांमध्ये तब्बल 11 गड्यांना माघारी धाडलं आहे. केकेआरच्या उमेशने 10 विकेट्स घेतले असून तो दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वाधिक विकेट्स घेतल्यामुळे चहलकडे सध्या पर्पल कॅप देण्यात आली आहे.
बटलरकडे ऑरेंज कॅप
या पाठोपाठ सर्वाधिक धावा ठोकणाऱ्याकडे ऑरेंज कॅप दिली जाते. ही कॅपदेखील सध्या राजस्थान रॉयल्स संघाकडे आहे. आयपीएल 2022 मध्ये शतक ठोकणाऱ्या जोस बटलरला ही ऑरेंज कॅप देण्यात आली आहे. जोस बटलरने 4 सामन्यात 218 धावा ठोकल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- RR Vs LSG, IPL 2022: राजस्थानची भेदक गोलंदाजी, रोमांचक सामन्यात लखनौचा 3 धावांनी पराभव
- KKR vs DC Top 10 Key Points : दिल्लीचा कोलकात्यावर 44 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- KKR vs DC Result : टेबल टॉपर केकेआर पराभूत, दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीकडून 44 धावांनी पराभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha