KKR vs DC, IPL 2022 : आयपीएलच्या आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सला44 धावांनी मात देत एका दमदार विजयाची नोंद केली. सामन्यात दिल्लीने दमदार फटकेबाजी आणि नंतर उत्तम गोलंदाजीच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केलं आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 216 धावांचे तगडे लक्ष्य केकेआरसमोर ठेवले तर केकेआरला 20 षटकात 171 धावांवर रोखले. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...



  1. आतापर्यंत पाहत असलेल्या आय़पीएलच्या बहुतांश सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करुन मग धावा चेस करतो. पण आज केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करुनही त्यांना पराभव पत्करावा लागला.

  2. सामना दुपारी असल्याने दुसऱ्या डावात दवामुळे अधिक अडचण येत नव्हती, ज्यामुळे दिल्लीने चोख गोलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं.

  3. दिल्लीकडून सलामीवीर वॉर्नर आणि शॉ यांनी एक चांगली सुरुवात करुन दिल्याने संघाला फायदा झाला. 

  4. दिल्ली संघाने सुरुवातीपासून फलंदाजीत दम कायम ठेवला, मधली फळी पंतने तर अखेर शार्दूल अक्षरने डाव सांभाळला.

  5. दिल्लीला स्कोर 200 पार पोहोचवण्यात यश आल्याने समोरच्या संघावर आधीच प्रेशर होतं, ज्याचा फायदा दिल्लीने उचलत सहज विजय मिळवला.

  6. केकेआरकडून कर्णधार श्रेयसने 51 धावा झळकावत एकहाती झुंज दिली, पण त्याला साथ न मिळाल्याने त्याची झुंज व्यर्थ ठरली

  7. दिल्लीने सुरुवातीपासून कसून गोलंदाजी कायम ठेवली, शिवाय त्यांनी विकेट्स घेणंही कायम ठेवलं.

  8. कुलदीपच्या एका षटकातील महत्त्वपूर्ण तीन विकेट्स संघाला खूप फायदेशीर ठरल्या.

  9. खलीलने देखील महत्त्वाच्या तीन विकेट्स घेतल्याने संघाला अधिक फायदा झाला.

  10. पंतने कर्णधार म्हणून अगदी उत्तम निर्णय घेत गोलंदाजी फिरवल्याने दिल्लीचा विजय सोपा झाला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha