IND vs PAK: मेलबर्नमध्ये टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी कशी? पाहा काय सांगतायेत आकडे?
IND vs PAK, T20 World Cup 2022: भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया आज टी-20 विश्वचषकातील त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी खेळणार आहे.
IND vs PAK, T20 World Cup 2022: भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया आज टी-20 विश्वचषकातील त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी खेळणार आहे. मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) खेळल्या जाणाऱ्या या महामुकाबल्याकडं सर्वांचचं लक्ष लागलंय. या मैदानावरील अनुभव आणि सक्सेस रेटच्या बाबतीत पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा खूपच मागं आहे. दरम्यान, भारताच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील कामगिरीवर एक नजर टाकुयात.
भारताची मेलबर्नमधील आतापर्यंतची कामगिरी
भारतानं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 1 फेब्रुवारी 2008 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला होता. या सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागलं होतं. हा सामना ऑस्ट्रेलियानं 9 विकेट्स राखून जिंकला होता. त्यानंतर पुढच्या दोन सामन्यात भारतानं विजय मिळवला. भारतानं एक सामना आठ विकेट्सनं आणि दुसरा सामना 27 धावांनी जिंकला. दोन्ही संघातील चौथा सामना अनिर्णित ठरला. या आकड्यांवर नजर टाकता भारताचं पारडं जडं दिसत आहे.
एकमेव सामन्यात पाकिस्तानचा पराभव
पाकिस्तानच्या संघानं या मैदानावर आतापर्यंत एकच सामना खेळला आहे. ज्यात त्यांना दोन धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान, 5 फेब्रुवारी 2010 मध्ये झालेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला 127 धावांवर ऑलआऊट केलं. परंतु, त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यापुढं पाकिस्तानचा संघ संघर्ष करताना दिसला. पाकिस्तानला निर्धारीत 20 षटकात 125 धावापर्यंत मजल मारता आली. ज्यामुळं हा सामना ऑस्ट्रेलियानं दोन धावांनी जिंकला.
विराट मेलबर्नमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं मेलबर्नच्या मैदानावर तीन टी-20 सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामन्यात त्यानं 90 धावांची खेळी केलीय. यादरम्यान, त्याचा स्ट्राईक रेट 157.89 इतका राहिला आहे. प्रवीण कुमार हा या मैदानावर सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला आहे. प्रवीणनं दोन सामन्यांत 36 धावांत तीन विकेट्स घेतले आहेत.
ट्वीट-
Two massive Super 12 matches 🔥
— ICC (@ICC) October 23, 2022
Who are you supporting today?#T20WorldCup | #SLvIRE | #INDvPAK pic.twitter.com/v3rd73MKR1
हे देखील वाचा-