World Cup 2023 Points Table Update : गतविजेत्या इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. सहा सामन्यात इंग्लंडला पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडचा संघ पाच पराभवासह तळाला आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाने सलग सहाव्या विजयाची नोंद करत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. भारतीय संघाने सहाव्या विजयासह सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. भारतीय संघाचे अद्याप तीन सामने शिल्लक आहेत. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्याबरोबर टीम इंडियाला खेळायचे आहे.
टॉप 4 ची स्थिती काय ?
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेनं टॉप-4 मध्ये बदल करत अव्वल स्थान गाठलं होतं. पण आज टीम इंडियाने पुन्हा एकदा अव्वल स्थान काबिज केलेय. टीम इंडिया 12 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेने सहा सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचे समान गुण आहेत, पण न्यूझीलंड सरस रनरेटमुळे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
इतर संघाची स्थिती काय ?
श्रीलंका निगेटिव्ह -0.205 च्या नेट रनरेटसह 4 गुण मिळवत पाचव्या, पाकिस्तान निगेटिव्ह -0.387 च्या नेट रनरेटसह 4 गुण मिळवत सहाव्या, अफगाणिस्तान निगेटिव्ह -0.969 च्या नेट रनरेटसह 4 गुण मिळवत सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. बांगलादेश निगेटिव्ह -1.338 च्या नेट रनरेटसह 2 गुण मिळवत नवव्या, इंग्लंड निगेटिव्ह -1.652 च्या खराब नेट रनरेटसह 2 गुण मिळवत दहाव्या क्रमांकावर आहे.
भारताचा विजयी षटकार, इंग्लंडचा पाचवा पराभव -
World Cup 2023, IND vs ENG: विश्वचषकात टीम इंडियाने सलग सहाव्या विजयाची नोंद केली. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. भारताने 229 धावांच्या माफक आव्हानाचा यशस्वी बचाव केला. इंग्लंडचा संपूर्ण संघ 129 धावांत गारद झाला. रोहित शर्माच्या अर्धशतकानंतर मोहम्मद शामी आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक मारा केला. शामीने चार तर बुमराहने तीन विकेट घेतल्या. या विजयासह टीम इंडियाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलेय. इंग्लंडचा विश्वचषकातील पाचवा पराभव होय. या पराभवासह इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय.