एक्स्प्लोर

World Cup 2023 : आगामी एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी गंभीरनं निवडले 4 फिरकीपटू, चहलला स्थान नाही

Team India : 2022 मध्ये टी20 विश्वचषक झाल्यानंतर आता 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक होणार असून नेमकी कोणा-कोणाला संधी संघात मिळणार हे पाहावं लागेल.

Team India for World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) यंदा पार पडणार असल्यानं आता विश्वचषकासंबधी चर्चा हळूहळू वाढताना दिसत आहेत. यंदाच्या विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे (india to host odi world cup) आहे. ज्यामुळे टीम इंडियाकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत. याआधी या संघाने 2011 च्या विश्वचषकात (2011 World Cup) विजेतेपद पटकावले होते. यावर्षी होणाऱ्या विश्वचषकाबाबत, संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) भारतीय संघासाठी चार फिरकीपटूंची निवड केली आहे. पण त्याने संघाचा जादुई आणि अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) आपल्या यादीतून दूर ठेवलं आहे.

या फिरकीपटूंची केली निवड

एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करत गंभीरने संघात अक्षर पटेल (Axar Patel), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) यांची निवड केली. त्याने आपल्या यादीत युझवेंद्र चहलचा समावेश केला नाही. चहल हा संघातील अनुभवी फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. या यादीत समाविष्ट असलेला वॉशिंग्टन सुंदर सातत्याने संघाचा भाग बनत नाही. याशिवाय कुलदीप यादवही संघासाठी सतत सामने खेळत नाही. दुसरीकडे, रवी बिश्नोई हा युवा फिरकी गोलंदाज असून त्याने आतापर्यंत संघासाठी एकच एकदिवसीय सामना खेळला आहे.

कुलदीप-अक्षरची निवड करण्यामागील कारण काय?

एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी संघात नेमकी कोणाला संधी मिळेल हे पाहण्याजोगे असणार असून गंभीरनं निवडलेल्या फिरकीपटूंमध्ये अक्षर पटेल आणि कुलदीप यादव सध्या उत्कृष्ट लयीत असल्यानं त्यांना स्थान मिळालं आहे. कुलदीपने अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी करताना 3 विकेट्स घेतले. कुलदीप यादवला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तो संघासाठी दमदार कामगिरी करतो. याशिवाय अक्षर पटेल सध्या गोलंदाजी आणि फलंदाजीतही चांगली कामगिरी करताना दिसत आहे. अक्षरने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत शानदार फलंदाजी केली होती. त्या मालिकेतील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला 'प्लेअर ऑफ द सिरीज' म्हणून निवडण्यात आले.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget