एक्स्प्लोर

ENG vs SL : ग्रुप 1 मधून न्यूझीलंडसोबत कोणता संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार? आजच्या इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सामन्यानंतर होणार स्पष्ट

T20 WC : टी20 वर्ल्ड कपमध्ये आज ग्रुप 1 मधील महत्त्वपूर्ण सामना खेळवला जाणार आहे. यामध्ये इंग्लंड आणि श्रीलंका आमने-सामने असणार आहेत.

Semifinal in T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत आज ग्रुप 1 मधील इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (ENG vs SL) असा सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे ग्रुप 1 मधून न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला असून दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलियासह इंग्लंडमध्ये चुरस आहे. कारण ग्रुप 1 मधील श्रीलंका, अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांचं आव्हान आधीच संपलं आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाकडे 7 गुण असून आज इंग्लंड जिंकल्यास त्यांच्याकडेही 7 गुण येतील. पण इंग्लंडचा नेटरन रेट चांगला असल्याने ते नक्कीच सेमीफायनलमध्ये जातील. त्यामुळे आज ऑस्ट्रेलियन चाहते श्रीलंकेच्या विजयाची अपेक्षा करतील. 

कधी, कुठे पाहाल सामना?

आजचा हा इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (England vs Sri Lanka) सामना भारतीय वेळेनुसार 1.30 वाजता खेळवला जाईल. सामन्याआधी अर्धातास नाणेफेक होईल. दरम्यान हा महत्त्वपूर्ण सामना सिडनीच्या क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाईल. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

कशी आहे ग्रुप 1 ची गुणतालिका?

सुपर-12 ग्रुप 1

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
1 न्यूझीलंड 5 3 1 1 7 +2.113
2 ऑस्ट्रेलिया 5 3 1 1 7 -0.173
3 इंग्लंड 4 2 1 1 5 +0.547
4 श्रीलंका 4 2 2 0 4 -0.457
5 आयर्लंड 5 1 3 1 2 -1.165
6 अफगाणिस्तान 5 0 2 2 2 -0.718

ग्रुप 2 चं काय?

भारत असणाऱ्या ग्रुप 2 चा विचार करता सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी अगदी चुरशीची लढत दिसून येत आहे. आधी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघच सेमीफायनलचे दावेदार होते, पण पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेवर एक मोठा विजय मिळवत गुणतालिकेत आघाडी घेतली असून सेमाफायनलच्या रेसमध्ये पुनरागमन केलं आहे.  तर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकल्यावर गुणतालिकेत ते थेट तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. तसंच त्यांचा नेट रनरेटही +1.441 इतका झाल्यामुळं ते स्पर्धेत मजबूत स्थितीत आले आहेत. भारत अव्वलस्थानी असला तरी नेटरनरेटच्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या मागे आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. हे तीन संघच सेमीफायनलच्या शर्यतीत पुढे असून नेदरलँड, झिम्बाब्वे यांचं आव्हान जवळपास संपलं आहे. बांगलादेशचंही पुढे पोहोचणं अवघड आहे.

क्रमांक संघ सामने विजय पराभव अनिर्णित गुण नेट रनरेट
1 भारत 4 3 1 0 6 +0.730
2 दक्षिण आफ्रिका 4 2 1 1 5 +1.441
3 पाकिस्तान 4 2 2 0 4 +1.117
4 बांगलादेश 4 2 2 0 4 -1.276
5 झिम्बाब्वे 4 1 2 0 3 -0.313
6 नेदरलँड्स 4 1 3 0 2 -1.233

हे देखील वाचा-

T20 World Cup 2022 : भारत विरुद्ध पाकिस्तानसह 'या' पाच सामन्यांनी चाहत्यांची धाकधुक वाढवली, पाहा हायवोल्टेज सामन्यांची यादी

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मुंबईत प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले, प्रविण दरेकरांचा भाऊ रिंगणात
आमदार प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले
BMC Election 2026: रामदास आठवलेंचा भाजपला धक्का, मुंबईतील 39 वॉर्डात रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवले, कोणाला संधी?
रामदास आठवलेंचा भाजपला धक्का, मुंबईतील 39 वॉर्डात रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवले, कोणाला संधी?
Amol Balwadkar : विधानसभेला चंद्रकांत पाटलांना नडले; पक्षाने डावलून दिलं लहू बालवाडकरला तिकीट, अमोल बालवडकर अजित पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
विधानसभेला चंद्रकांत पाटलांना नडले; पक्षाने डावलून दिलं लहू बालवाडकरला तिकीट, अमोल बालवडकर अजित पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
Nashik Election 2026: नाशिकमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे पहिले चार उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली संधी?
नाशिकमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे पहिले चार उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली संधी?

व्हिडीओ

Sambhajinagar Angry Candidate : तिकीट नाकरलं, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा संभाजीनगरमध्ये तुफान राडा
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया
Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मुंबईत प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले, प्रविण दरेकरांचा भाऊ रिंगणात
आमदार प्रकाश सुर्वेंविरोधात शिवसैनिकांची निदर्शनं, वॉर्ड क्रमांक 3 भाजपकडे गेल्यानं सुर्वेंना काळे झेंडे दाखवले
BMC Election 2026: रामदास आठवलेंचा भाजपला धक्का, मुंबईतील 39 वॉर्डात रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवले, कोणाला संधी?
रामदास आठवलेंचा भाजपला धक्का, मुंबईतील 39 वॉर्डात रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवले, कोणाला संधी?
Amol Balwadkar : विधानसभेला चंद्रकांत पाटलांना नडले; पक्षाने डावलून दिलं लहू बालवाडकरला तिकीट, अमोल बालवडकर अजित पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
विधानसभेला चंद्रकांत पाटलांना नडले; पक्षाने डावलून दिलं लहू बालवाडकरला तिकीट, अमोल बालवडकर अजित पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
Nashik Election 2026: नाशिकमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे पहिले चार उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली संधी?
नाशिकमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे पहिले चार उमेदवार जाहीर, कुणाला मिळाली संधी?
Ramdas Athawale: महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
महायुतीने आम्हाला 4 वाजता जागावाटपाच्या चर्चेला बोलावलं अन्... हा निव्वळ विश्वासघात; रामदास आठवले प्रचंड संतापले
Shivsena UBT And MNS Candidate List BMC Election 2026: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; ठाकरे बंधूंची भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 97 उमेदवारांची यादी; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
Embed widget