एक्स्प्लोर

World Cup 2019 : भारताच्या पराभवाने शोएब अख्तर निराश, विजयासाठीच्या प्रार्थना कामी न आल्याची खंत

या विजयानंतर इंग्लंडच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राहिल्या आहेत. मात्र दुसरीकडे भारताच्या विजयासाठी प्रार्थना करणाऱ्या पाकिस्तानचा प्रवास मात्र आता खडतर झाला आहे.

मुंबई : विश्वचषकाच्या साखळी सामन्यात यजमान इंग्लंडने टीम इंडियाचा 31 धावांनी पराभव केला. टीम इंडिया या पराभवानंतर पाकिस्तान आणि बांग्लादेशचे चाहते खूप निराश झाले आहे. टीम इंडियाच्या या पराभवावर आमची प्रार्थनासुद्धा भारतासाठी कामी न आल्याचं वक्तव्य पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज खद्द शोएब अख्तरने केलं आहे. कालच्या सामन्यात आम्हाला भारताने इंग्लंडला हरवलेलं हवं होतं, कारण इंग्लंड हरल्यास विश्वचषकातील आमची पुढची वाटचाल सुरळीत झाली असती. पण पाकिस्तान आणि बांग्लादेशातील कोट्यावधी लोकांचे आशीर्वाद भारतापर्यंत पोहचू शकले नाहीत, असं मतं शोएब अख्तरने व्यक्त केलं आहे. भारत पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानने भारताला प्रथमच पाठिंबा दिला. टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थाना केल्या असल्याचंही शोएब म्हणाला. दरम्यान या विजयानंतर इंग्लंडच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राहिल्या आहेत. मात्र दुसरीकडे भारताच्या विजयासाठी प्रार्थना करणाऱ्या पाकिस्तानचा प्रवास मात्र आता खडतर झाला आहे. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरलं आहे. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध विजयासोबत इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून रहावं लागणार आहे. INDIA VS ENGLAND | बर्मिंगहॅमच्या लढाईत इंग्लंडची टीम इंडियावर मात | विश्वचषक माझा | ABP Majha सामन्यात काय झालं? बर्मिंगहॅमच्या लढाईत इंग्लंडनं भारतावर 31 धावांनी मात करून, आठ सामन्यांमधला पाचवा विजय साजरा केला. या विजयामुळं इंग्लंडच्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा अजूनही शाबूत आहेत. या सामन्यात इंग्लंडनं दिलेल्या 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 50 षटकांत पाच बाद 306धावांचीच मजल मारता आली. रोहित शर्मानं झळकावलेलं शतक भारताच्या डावाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. त्यानं विराट कोहलीच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण ती जोडी फुटली आणि टीम इंडिया विजयापासून दूर राहिली.

महत्त्वाच्या बातम्या

Pat Cummins : बेस्ट टीम मैदानात उतरवल्यानंतरही घरच्या मैदानावर बांगलादेशकडून पराभव, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
बांगलादेशनं 23 वर्षात जे जमलं नाही ते करुन दाखवलं, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Aus vs Ban 1st Test : बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
IND vs SL 1st Test DAY-2 : पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget