WBC 2022 : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अश्विनी-सिक्की आणि तनीषा-ईशानची विजयी सुरुवात, प्रणीत मात्र पराभूत
World Badminton Championship 2022: बी. साई प्रणीत जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या पहिल्याच दिवशी पराभूत झाला आहे. पण भारतीय खेळाडूंनी महिला दुहेरी मिश्र दुहेरीत विजय मिळवला आहे.
BWF World Badminton Championship : बी.साई प्रणीत जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या (World Badminton Championship 2022) पहिल्याच दिवशी अर्थात सोमवारी तीन सेट्समध्ये झालेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे भारताने महिला दुहेरी मिश्र दुहेरीत मात्र विजय मिळवला आहे. वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2019 स्पर्धेत कांस्य पदकाला गवसणी घातलेल्या विजेता प्रणीतला आज चीन तायपेच्या चो टिएन चेन याने 15-21, 21-15 आणि 15-21 अशा सेट्समध्ये मात दिली.
प्रणीतनं टोकियो येथे सलग दुसऱ्या वर्षी निराशाजनक प्रदर्शन केलं. त्याने मागील वर्षी देखील ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये निराशाजनक प्रदर्शन केलं आहे. तेव्हाही तो सुरुवातीच्या फेरीतच स्पर्धेबाहेर गेला होता. दुसरीकडे भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांनी महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत मालदीवच्या अमिनाथ नबिहा अब्दुल रज्जाक आणि फातिमाथ नबाहा अब्दुल रज्जाक यांचा 21-7 आणि 21-9 च्या फरकाने पराभव केला आहे. आता अश्विनी आणि सिक्की यांना दुसऱ्या फेरीत चीनच्या चेन किंग चेन आणि जिया यी फॅन यांचा सामना करावा लागणार आहे.
BWF World Championships 2022: Ashwini Ponappa/N Sikki Reddy 🇮🇳 beat Aminath Razzaq/Fathimath Razzaq 🇲🇻 21-7, 21-9 in the Round of 64.🔥
— Sportskeeda (@Sportskeeda) August 22, 2022
They will face Cheng Qinchen/Jia Yifan 🇨🇳 in the next round.#BWFWorldChampionships2022 #Tokyo2022 pic.twitter.com/cvHPbQ71Dm
याशिवाय भारताची मिश्र जोडी तनीषा क्रास्टो आणि ईशान भटनागर यांनी मिश्र दुहेरीमध्ये जर्मनीच्या पॅट्रिक स्कील आणि फ्रांजिस्का वोल्कमॅन यांना 29 मिनिटं चाललेल्या सामन्यात 21-13 आणि 21-13 अशा फरकाने मात देत स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. यानंतर आता भारताची ही मिश्र जोडी पुढील फेरीत थायलंडच्या सुपक जोमकोह आणि सुपिसारा पावसमप्रान यांच्याशी सामना करावा लागणार आहे.
लक्ष्य सेनचीही विजयी सुरुवात
आघाडीचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने (Lakshya Sen) विजयी घौडदौड सुरुच ठेवली आहे. त्याने या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्येही विजयी सुरुवात केली आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत लक्ष्य सेननं डेन्मार्कच्या हंस-क्रिस्टियन विटिंगसचा (Hans-Kristian Vittinghus) 21-12, 21-11 असा पराभव केलाय. या विजयासह त्यानं पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
हे देखील वाचा-