एक्स्प्लोर
नरसिंगच्या ऑलिम्पिक सहभागावर अजूनही प्रश्नचिन्ह

नवी दिल्लीः भारताचा पैलवान नरसिंग यादवच्या ऑलिम्पिकमधल्या सहभागावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. नरसिंगला डोपिंगप्रकरणी क्लिन चीट देण्याचा नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडाचा निर्णय वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीनं (वाडा) फेटाळून लावला आहे. 'वाडा'ने नाडाच्या त्या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे अपील केलं आहे. या प्रकरणात उत्तर देण्यासाठी नरसिंगनं दोन दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. त्यामुळं आता त्याची सुनावणी 18 ऑगस्टला सायंकाळी साडेपाच वाजता होईल. रिओ ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाईल कुस्तीतल्या 74 किलो वजनी गटाच्या लढती 19 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहेत. त्यासाठी नरसिंग रिओमध्ये दाखलही झाला आहे. पण त्याला रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणार की नाही, याचा निर्णय आता क्रीडा लवादच घेणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























