Winter olympics : आधी कॅन्सरमुळे खचला, नंतर मैदानात उतरून पटकावले सुवर्णपदक!
भारतीय संघाचा (Indian Cricket Team) माजी खेळाडू युवराज सिंग (Yuvraaj Singh) कर्करोगाने (Cancer) ग्रस्त होता. पण तो सावरला आणि मैदानात परतला.
![Winter olympics : आधी कॅन्सरमुळे खचला, नंतर मैदानात उतरून पटकावले सुवर्णपदक! Winter Olympic Canadian Max Parrot won gold medal sport marathi news Winter olympics : आधी कॅन्सरमुळे खचला, नंतर मैदानात उतरून पटकावले सुवर्णपदक!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/08/3d896fe432392a76c492b91599f07d3e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Winter Olympic Canadian Max Parrot won gold medal : कर्करोगाशी (Cancer) लढा देऊन मैदानात परतणे हे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नाही. त्यासाठी खूप हिंमत लागते. भारतीय संघाचा (Indian Cricket Team) माजी खेळाडू युवराज सिंग (Yuvraaj Singh) कर्करोगाने (Cancer) ग्रस्त होता. पण तो सावरला आणि मैदानात परतला. पण आता युवराजप्रमाणेच कॅनडाच्या एका खेळाडूने कॅन्सरशी लढा देऊन लढाई जिंकली आणि परतल्यानंतर सुवर्णपदक जिंकले.
कर्करोगाविरुद्ध दीर्घकाळ लढा
कॅनेडियन स्नोबोर्डिंग खेळाडू मॅक्स पॅरोटने (Max Parrot) कर्करोगाविरुद्ध दीर्घकाळ लढा दिला आणि तो जिंकला. त्याने सोमवारी हिवाळी ऑलिम्पिकच्या (Winter Olympic) स्नोबोर्डिंग स्पर्धेत (Snow Boarding) पुरुषांच्या स्लोपस्टाइल प्रकारात सुवर्णपदक जिंकून पुनरागमन केले आणि त्याचा आनंद साजरा केला. पॅरोटच्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची दुसरी उडी. जेव्हा तो दुसऱ्या किकरवर (रॅम्प) पोहोचला, तेव्हा सरळ जाण्याऐवजी तो एक कोन घेत तेथे पोहोचला आणि असे करणारा तो एकमेव प्रतिस्पर्धी होता. त्यानंतर तो मागे झुकला. 1440 अंशांची फिरकी घेत त्याने लँडिंग केले.
संपूर्ण कारकिर्दीतील हा सर्वात मोठा विजय
सुवर्णपदक जिंकल्यानंतर पॅरोट म्हणाला, "माझ्या संपूर्ण कारकिर्दीतील हा सर्वात मोठा विजय आहे. यानंतर त्यांना सहा महिन्यांत 12 वेळा केमोथेरपी द्यावी लागली. तसेच या सोबत लढण्यासाठी मला सर्वस्वाचा त्याग करावा लागला. मी इतके डिप्रेशनमध्ये गेलो की मी माझ्या स्नोबोर्ड कपाटाला प्रथमच कुलूप लावले होते. त्यावेळी मला सिंहाला पिंजऱ्यात बंद केल्यासारखे वाटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- पिझ्झा हट आणि केएफसीकडूनही काश्मीरबाबत ट्विट, नेटकरी संतापले
- Covid19 : कोरोना विषाणूचा डोळ्यांवर परिणाम; 90 टक्के लोकांच्या दृष्यमानतेत फरक, अभ्यासात दावा
- WHO on Coronavirus : कोरोना विषाणूचा परिणाम वर्षानुवर्षे राहणार, जागतिक आरोग्य संघटनेचा दावा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)