Coronavirus Cases Today : कोरोनाबाधितांमध्ये घट मात्र मृत्यूचे प्रमाण वाढते, देशात गेल्या 24 तासांत 67 हजार 597 नवे रुग्ण
Coronavirus Cases Today in India : आतापर्यंत जगभरात 39.80 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 कोटी 22 लाखाहून अधिक लोक भारतातील आहेत.
Coronavirus Cases Today in India : भारतात कोरोनाची तिसरी लाट ओसरताना पाहायला मिळतेय. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असली तरी कोरोनाबळींचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. देशात गेल्या 24 तासांत 67 हजार 597 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 1188 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाचे 83 हजार 876 नवे रुग्णांची नोंद झाली होती आणि 896 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे कोरोनारुग्णांची संख्या घटल्याचं पाहायला मिळतंय. चांगली बाब म्हणजे गेल्या 24 तासांत एक लाख 80 हजार 456 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत, म्हणजेच एक लाख 14 हजार सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत.
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण चार कोटी 23 लाख 39 हजार 611 जणांना लागण झाली आहे. त्यापैकी 5 लाख 4 हजार 62 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 कोटी 8 लाख 40 हजार लोक बरे झाले आहेत. देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांपेक्षा कमी आहे. एकूण 9 लाख 94 हजार 891 जणांना अजूनही कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
- कोरोनाची एकूण प्रकरणे - चार कोटी 23 लाख 39 हजार 611
- एकूण डिस्चार्ज - 4 कोटी 8 लाख 40 हजार 658
- एकूण सक्रिय प्रकरणे - 9 लाख 94 हजार 891
- एकूण मृत्यू - 5 लाख 4 हजार 62
एकूण लसीकरण - 170 कोटी 21 लाख 72 हजार डोस देण्यात आले
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 7 फेब्रुवारी 2022 पर्यंत देशभरात कोरोना लसीचे 170 कोटी 21 लाख 72 हजार डोस देण्यात आले आहेत. सोमवारी दिवसभरात 55.78 लाख लसीचे डोस देण्यात आले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, आतापर्यंत सुमारे 74.29 कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत. सोमवारी दिवसभरात 13.46 लाख नमुन्यांची कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
मृत्यू दर 1.19 टक्क्यांवर
देशात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे तर बरे होण्याचे प्रमाण 96.19 टक्क्यांवर आले आहे. सक्रिय प्रकरणे 2.62 टक्के आहेत. कोरोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत भारत आता जगात 11 व्या स्थानावर आहे. एकूण संक्रमित संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Covid19 : कोरोनाचा डोळ्यांवर परिणाम; 90 टक्के लोकांच्या दृष्यमानतेत फरक, अभ्यासात दावा
- पिझ्झा हट आणि केएफसीकडूनही काश्मीरबाबत ट्विट, नेटकरी संतापले
- ट्रम्प यांच्या अडचणी वाढणार? व्हाईट हाऊसमधून गायब झालेली पत्रं ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha