एक्स्प्लोर

तेजश्री प्रधाननंतर नॅशनल क्रश घेणार मुख्यमंत्री फडणवीसांचा इंटरव्हयू! महानगरपालिका निवडणुकीच्या धुरळ्यात देवाभाऊंचा इमेज बिल्डिंगचा नवा खेळ!

पालिका निवडणुकीच्या धुरळ्यात मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधाननंतर आता नुकतीच नॅशनल क्रश ठरलेली अभिनेत्री गिरीजा ओक देवा भाऊंची मुलाखत घेणार आहे.

Girija Oak Interview CM Devendra Fadanvis: राज्यभरात महापालिका निवडणुकांचा धुरळा उडतोय. पक्षफुटी, नाराजीनाट्य रंगू लागली आहेत. सत्तेचं पारडं कुठे झुकणार याकडे प्रत्येक नागरिकाचं लक्ष लागलंय.  मनपा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षांच्या सभांचा दणका उडालाय. प्रचार रंगात आलाय. निमित्ताने अनेक नेते मुलाखती देताना दिसतायत.  राज्यातील महापालिका रणधुमाळीत मुंबई, ठाणे, पुण्यातील लढतींकडे विशेष लक्ष असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या एका नव्या इमेज बिल्डिंगच्या राजकीय पॅटर्नकडे सगळ्यांचं लक्ष जातंय. पालिका निवडणुकीच्या धुरळ्यात मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधाननंतर आता नुकतीच नॅशनल क्रश ठरलेली अभिनेत्री गिरीजा ओक देवा भाऊंची मुलाखत घेणार आहे.

ठाण्यात तेजश्री, पुण्यात गिरीजा!

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा वेग वाढलेला असताना बड्या राजकीय नेत्यांच्या मुलाखतींनी निवडणुकांना नवा रंग चढला आहे. यात अनेक नेत्यांच्या मुलाखती चर्चेत असताना काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेच्या पाश्वभूमीवर 'वीण दोघातली तुटेना' या लोकप्रीय मालिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधानने 'आपलं ठाणे आपले देवाभाऊ' कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत तिने मुंबईकर म्हणून काही प्रश्न आणि समस्या देखील मांडल्याचं पाहायला मिळालं. 

आता देशभरातील तरुणाईची क्रश म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पुणे शहराच्या 'संवाद पुणेकरांशी' नावाचा विशेष संवादात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ही मुलाखत होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (11 जानेवारी ) सायंकाळी 7 वाजता एरंडवणे येथील शुभारंभ लॉन्स येथे थेट नागरिकांशी संवाद साधणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाचा सेलिब्रिटी पॅटर्न 

कुठल्याही प्रचारात लोकप्रिय चेहरा त्यातूनही एखाद्या लोकप्रिय अभिनेत्रीचा चेहरा असला की लोकांचं लक्ष आपोआप आपल्याकडे वळतं हे राजकारणातलं तसं जुनंच समिकरण. हे भारतीय जनता पक्षाने बरोबर हेरले असल्याची चर्चा होतेय. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाला अनेक मराठी कलाकारांनी जाहीर समर्थन दिल्याचंही दिसलं होतं. यात अभिनेते व निर्माते महेश कोठारे यांच्यासह अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं भाजप प्रेम नागरिकांनी नुकतंच पाहिलंय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाच सेलिब्रिटी पॅटर्न आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतींमध्येही दिसतोय. ठाण्यात अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि पुण्यात नॅशनल क्रश गिरीजा ओक हे चेहरे मुलाखतकार म्हणून दिसणार असल्याने चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vanita Kharat Scam: 'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
'तुमचं पार्सल येणार आहे, डिलिव्हरी बॉयला पत्ता मिळत नाहीय' 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनीता खरातसोबत घडला 62 हजाराचा स्कॅम, VIDEO
Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Embed widget