India Open 2022: सायना नेहवालचा पराभव करणारी मालविका बनसोड आहे तरी कोण? घवघवीत यश मिळाल्यानंतर काय म्हणाली?
India Open 2022: वयाच्या आठव्या वर्षापासून मालविका बॅडमिंटन खेळत आहे. रायपूरमध्ये संजय मिश्रा य़ांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
India Open 2022: नागपूरची युवा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बनसोड (Malvika Bansod) हिनं गुरुवारी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत ऑलिम्पिक कांस्य विजेत्या सायना नेहवालवर (Saina Nehwal) अवघ्या 34 मिनिटांत सरळ गेममध्ये 21-17, 21-10 फरकानं विजय मिळवलाय. हा आपल्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया 20 वर्षांच्या मालविकाने विजयानंतर व्यक्त केली.
घवघवीत यश मिळाल्यावर मालविका काय म्हणाली?
"मला आतापर्यंत विश्वासच होत नाही की मी सायनाला हरविले आहे. हा शानदार अनुभव ठरला. मी विजयामुळे फारच आनंदी आहे. सायना माझी आदर्श खेळाडू आहे. सायना एका दशकाहून अधिक काळ भारतीय बॅडमिंटनचे नेतृत्व करीत होती. मी सायनाला खेळताना पाहूनच करिअरची सुरुवात केली. माझ्या खेळावर खरे तर सायनाचा फारच प्रभाव आहे. सायनाच्या खेळाची शैली मला आवडते. सायनाच्या फटक्यांमध्ये अधिक ताकद असल्यामुळे मला तिचा खेळ आवडतो."
मालविका बनसोड कोण आहे?
मालविका ही मुळची नागपूरची रहिवासी आहे. तिचा जन्म 15 सप्टेंबर 2001 मध्ये झालाय. वयाच्या आठव्या वर्षापासून मालविका बॅडमिंटन खेळत आहे. रायपूरमध्ये संजय मिश्रा य़ांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिची आई डॉ. तृप्ती आणि वडील प्रबोध बनसोड हे दोघेही डेंटिस्ट आहेत. मालविकाला नागपूर भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलंय
मालविकाची आतापर्यंतची कामगिरी
- मालविका बनसोड 13 आणि 17 वयोगटातील राज्य विजेती ठरली.
- 2018 साली विश्व ज्यनियर बॅडमिन्टन स्पर्धेसाठी भारतीय संघात तिचा समावेश करण्यात आला.
- 2018 साली मालविकाने काठमांडूमध्ये दक्षिण आशियाई बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे.
-2019 मध्ये अखिल भारतीय वरिष्ठ गट रँकिंग स्पर्धेत बाजी मारली.
- 2019 मध्ये मालदिव आंतरराष्ट्रीय फ्यूचर सिरीज स्पर्धेचं जेतेपद पटकावलंय.
- हैदराबादमध्ये नुकतंच वरिष्ठ रँकिंग स्पर्धेचं विजेतेपद मिळवलंय.
- जागतिक क्रमवारीत मालविका 111 व्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-
- Australian Open 2022 : नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार! संयोजकांकडून मुख्य ड्रॉमध्ये समावेश
- West Indies vs Ireland: आयर्लंडचा वेस्ट इंडिजला दे धक्का; पाच विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha