एक्स्प्लोर

Wrestlers Protest : कुस्ती महासंघाला मोठा झटका, नॅशनल चॅम्पियनशिपवर बहिष्कार टाकून अनेक खेळाडू आंदोलनात सहभागी

Brij bhushan sharan singh : भारतीय कुस्ती महासंघाविरुद्ध भारतातील दिग्गज कुस्तीपटू आंदोलन करण्यासाठी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे उपस्थित झाले आहेत.

Wrestlers Protest At Jantar Mantar: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI President) अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij bhushan sharan singh) यांच्या विरोधात देशातील कुस्तीपटूंनी आंदोलन उभारलं आहे. दिग्गज कुस्तीपटूंसह या विरोध करणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशातील गोंडा येथील नंदिनी नगर स्टेडियममध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या कुस्तीपटूंचाही समावेश आहे. हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील अनेक खेळाडू येथे झालेल्या स्पर्धेत न खेळताच परतत आहेत. हे सर्व पैलवान भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिल्लीतील जंतरमतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत आहेत. 18 जानेवारीपासून बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशिवाय देशातील अनेक आघाडीच्या कुस्तीपटूंनी संघटनेच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

बरेच खेळाडू न खेळताच परतले

समोर येणाऱ्या माहितीनुसार, गोंडा येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेले बरेच खेळाडू न खेळताच परतत आहेत. आम्ही आमच्या इच्छेने खेळत नसल्याचे या खेळाडूंचे म्हणणे आहे. आम्ही दिल्लीत जंतरमंतरवर बसलेल्या आमच्या बंधू-भगिनींच्या समर्थनार्थ न खेळता जात आहोत. जंतरमंतरवर गेल्यावर तिथून घरी परतू, असे या खेळाडूंचे म्हणणे आहे. गोंडाच्या नंदिनी नगरमध्ये शनिवारपासून राष्ट्रीय चॅम्पियनशिप सुरू होत आहे. दरम्यान या खेळाडूंना भेटण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग शुक्रवारी स्टेडियमवर पोहोचले. यादरम्यान भाजप खासदार ब्रिजभूषण म्हणाले होते की, अनेक खेळाडू आमच्यासोबत आहेत. त्याचवेळी त्यांच्या या वक्तव्यानंतर अर्धा डझनहून अधिक खेळाडू न खेळताच परतत आहेत. त्यामुळे युनियनच्या अध्यक्षांना मोठा धक्का बसला आहे. गोंडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील अनेक खेळाडू आले होते.

काय नेमकं प्रकरण?

18 जानेवारी रोजी, देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंपैकी बजरंग पुनिया (Bajrang Puniya) आणि विनेश फोगट (Vinesh Phogat) यांनी जंतर-मंतर येथे भारतीय कुस्ती महासंघ आणि तिचे अध्यक्ष यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जंतर जंतर येथे आंदोलन करताना बजरंग पुनिया म्हणाला की, संघटनेने आपल्या खेळाडूंना गुलामासारखी वागणूक देऊ नये. तर विनेश फोगटने कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.  

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 PBKS vs LSG: 3 कॅच सोडल्या, रिकी पॉन्टिंग संतापला; श्रेयस अय्यर शशांक सिंहला तोंड लपवून घेऊन गेला, VIDEO
3 कॅच सोडल्या, रिकी पॉन्टिंग संतापला; श्रेयस अय्यर शशांक सिंहला तोंड लपवून घेऊन गेला, VIDEO
IPL 2026 PBKS vs LSG : नवा राजा, नवा रुबाब! श्रेयससमोर ऋषभ पंतची शरणागती, पंजाबचा विजयरथ सुसाट, तर लखनऊच्या पराभवाची हॅट्रिक
नवा राजा, नवा रुबाब! श्रेयससमोर ऋषभ पंतची शरणागती, पंजाबचा विजयरथ सुसाट, तर लखनऊच्या पराभवाची हॅट्रिक
PBKS vs LSG IPL 2026 : मुल्लानपूरमध्ये पंजाबचा 'गब्बर' विजय! लखनऊचा 54 धावांनी धुव्वा, प्रियांश अन् कॉनोलीनंतर यानसेन चमकला
PBKS vs LSG : मुल्लानपूरमध्ये पंजाबचा 'गब्बर' विजय! लखनऊचा 54 धावांनी धुव्वा, प्रियांश अन् कॉनोलीनंतर यानसेन चमकला
IPL 2026 Points Table : केकेआरचा पहिलाच अन् घातक वार! राजस्थान गुडघ्यावर, पण मुंबई हादरलं, पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्ट
केकेआरचा पहिलाच अन् घातक वार! राजस्थान गुडघ्यावर, पण मुंबई हादरलं, पॉइंट्स टेबलमध्ये ट्विस्ट

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ahilyanagar Crime News: 'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
Embed widget