Wasim Akram : पहिल्यांदा बॅटिंग करा आणि इंग्लंडला कोंडून घालून टाईम आऊट करा; वसीम आक्रमचा बाबर आणि कंपनीला शालजोड्यातला 'अँजलो मॅथ्यूज' फॉर्म्युला!
अक्रमने श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजसोबत झालेल्या टाईम आऊट घटनेच्या आधारे ही माहिती दिली. अँजेलो मॅथ्यूजला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले कारण त्याला फलंदाजीला येण्यासाठी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला.
Wasim Akram : पाकिस्तान संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. शेवटच्या सामन्यात इंग्लंडला 287 धावांनी पराभूत केले किंवा इंग्लंडविरुद्ध केवळ 3.4 षटकात लक्ष्य गाठले तरच ते अंतिम-4 मध्ये प्रवेश करू शकेल. या दोन्ही परिस्थितीत विजय शक्य नाही. विशेषत: इंग्लंडसारख्या संघाविरुद्ध हे खूप आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वसीम अक्रमने एक नवा फॉर्म्युला सुचवला आहे. हा फॉर्म्युला ऐकून हसू आवरणार नसले, तरी संघाला शालजोडे दिले आहेत.
Wasim Akram said, "Pakistan should bat first against England and post runs, then lock the England team in the dressing room and get them timed out". (A Sports). pic.twitter.com/0bYBuoy09I
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 10, 2023
वसीम अक्रमने म्हटले आहे की, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना चांगली धावसंख्या केली तर ते उपांत्य फेरीत पोहोचू शकतात आणि त्यानंतर इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 20 मिनिटांसाठी ड्रेसिंग रूममध्ये बंद करा, जेणेकरून इंग्लंडच्या सर्व खेळाडूंना टाईम आऊट करता येईल. वसीम अक्रमने श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजसोबत झालेल्या टाईम आऊट घटनेच्या आधारे ही माहिती दिली. श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात अँजेलो मॅथ्यूजला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले कारण त्याला फलंदाजीला येण्यासाठी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला. विकेट पडल्यानंतर नवीन फलंदाजाला दोन मिनिटांच्या अंतराने स्ट्राइक घ्यावा लागतो, अन्यथा नियमांनुसार त्याला आऊट दिले जाऊ शकते.
Wasim Akram - Pakistan can still qualify for semis, bat first against England and then lock them for 20 mins in dressing room so that the whole team is declared timed out.
— Cricketopia (@CricketopiaCom) November 10, 2023
😂😂
pic.twitter.com/yKrINsw5Yh
अँकरने फॉर्म्युला पुन्हा सांगितल्याने मिसबाहनेही खरपूस समाचार घेतला
वसीम अक्रमने पाकिस्तानी स्पोर्ट्स चॅनलचा अँकर आणि सहकारी पॅनेलिस्टशी केलेल्या संभाषणात ही माहिती दिली. हे रेकॉर्ड केले जाऊ शकले नाही परंतु अँकरने लाईव्ह शो दरम्यान हा फॉर्म्युला पुन्हा वापरला. अँकरसोबतच इतर पॅनेलचे सदस्य शोएब मलिक आणि मिसबाह उल हकही या सूत्रावर हसत राहिले. मिसबाहने पाकिस्तान संघाचाही समाचार घेतला. तो म्हणाला, वसीम भाई, तुम्ही मला अवघड काम सांगितले, यासाठीही पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना किमान 280 धावा कराव्या लागतील.
इतर महत्वाच्या बातम्या