एक्स्प्लोर
सचिनच्या निवृत्तीचं राज काय? तीन वर्षांनी पुन्हा चर्चा
मुंबई: मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटला अलविदा करुन तीन वर्षे होत आहेत. मात्र तीन वर्षानंतरही सचिनच्या निवृत्तीबाबतची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
सचिनच्या निवृत्तीच्या प्रश्नावर भारतीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं. सचिनची निवृत्ती हे आजही गुपीत आहे. पण त्याबाबत उघड बोलण्यास संदीप पाटील यांनी नकार दिला.
सचिनला निवृत्तीसाठी दबाव आणला का, याबाबतच्या प्रश्नावर संदीप पाटील म्हणाले, "काही गोष्टी या गुपीत ठेवाव्या लागतात. काही बाबी या बीसीसीआय आणि निवड समिती यांच्यातच मर्यादित राहतात. काही गोष्टी गुपीत/राज असतात, त्या उघड केल्या जाऊ शकत नाहीत".
मोठे निर्णय घेतले
"निवड समितीमध्ये असल्याचा दुष्परिणाम म्हणजे, तुम्ही तुमचा चांगला मित्र गमावता. पण काहीही करु शकत नाही. काही बाबी बोर्ड आणि निवड समितीमध्येच राहिलेल्या बऱ्या. आम्ही काही मोठे निर्णयही घेतले, त्याचा परिणाम म्हणजे टीम इंडिया आज सर्वच फॉर्मेटमध्ये उत्तम कामगिरी करताना दिसत आहे", असं संदीप पाटील यांनी नमूद केलं.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी काल भारतीय संघाची निवड करण्यात आली. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ही निवड केली.
संदीप पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. आता नव्या निवड समितीची घोषणा करण्यात येईल. त्यापूर्वी संदीप पाटील यांनी पत्रकारांशी गप्पा मारताना, सचिनच्या निवृत्तीबाबत सूचक विधान केलं.
सचिनने 14 नोव्हेंबर 2013 रोजी मुंबईतील वानखेडे मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळून, क्रिकेटला अलविदा केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement