एक्स्प्लोर
वकारची वन डेतील 'मॉडर्न डे' टीम, भारताच्या 2 खेळाडूंचाही समावेश
नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस यांनी मॉडर्न क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची एक टीम बनवली आहे. वकार यांनी आपल्या मॉडर्न ड्रीम वनडे टीमची ट्विटर घोषणा केली असून, यात दोन भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.
वकार यांच्या टीममध्ये दोन भारतीय, तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या प्रत्येकी तीन-तीन खेळाडूंचा समावेश आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी एक-एक खेळाडूचा आपल्या 12 खेळाडूंच्या टीममध्ये समावेश केला आहे.
https://twitter.com/waqyounis99/status/772029938157297666
भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आणि भारतीय कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली या दोन भारतीय खेळाडूंना वकार युनूस यांनी आपल्या ड्रीम टीममध्ये समाविष्ट केलं आहे. तर आपल्या ड्रीम टीमच्या कर्णधारपदाची धुरा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथकडे सोपवली आहे.
वकार युनूसह हे वेगवान गोलंदाज होते. त्यांनी आपल्या ड्रीम टीममध्येही एकूण चार वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. ज्यामघ्ये मोहम्मद आमीरचाही समावेश आहे. खरंतर आजच्या घडीला सर्वोत्कृष्ट विकेटकीपर म्हणून महेंद्रसिंग धोनीचं नाव समोर येतं. मात्र, वकार यांनी विकेटकीपर म्हणून इंग्लंडच्या जोस बटलरची निवड केली आहे.
वकार युनूस यांची ड्रीम टीम :
सलामीचे फलंदाज - डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), रोहित शर्मा (भारत)
मधली फळी - विराट कोहली (भारत), एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), स्टीव्ह स्मिथ(ऑस्ट्रेलिया)
विकेटकीपर – जोस बटलर(इंग्लंड)
गोलंदाज – बेन स्टोक्स (इंग्लंड), मोईन अली (इंग्लंड), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), मोहम्मद आमीर (पाकिस्तान), मुस्ताफिजुर रहमान (बांगलादेश)
12 वा खेळाडू – मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement