एक्स्प्लोर
विकेटकीपर म्हणून कोहलीची पसंती कोणाला?

बंगळुरु : विराट कोहलीची टीम इंडिया कसोटी दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजला रवाना झाली आहे. महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून विकेटकीपरचा प्रश्न टीम इंडियासमोर आहे. मात्र कसोटीमध्ये कोहलीने रिद्धीमान साहाला विकेटकीपर म्हणून पहिली पसंती दिली आहे. वेस्ट इंडिजला रवाना होण्यापूर्वी कर्णधार कोहली म्हणाला, "लोकेश राहुल सलामीचा फलंदाज आणि पार्टटाईम विकेटकीपर आहे. मात्र साहा विकेटकीपरच आहे. त्यामुळे कसोटीसाठी स्पेशल विकेटकिपर म्हणून साहालाच पसंती द्यावी लागेल".
लोकेश राहुलला संधी मिळाल्यास तो सलामीचा फलंदाज म्हणूनच खेळेल. फलंदाजीचा क्रम ऐनवेळी ठरवला जाईल. मात्र विकेटकीपर म्हणून त्याची भूमिका नसेल. कसोटीसाठी स्पेशल विकेटकीपरच असेल, त्यासाठी साहाचा पर्याय आहे, असं कोहलीने नमूद केलं. सध्या साहाची फलंदाजी सुधारली आहे. तो मोक्याच्या क्षणी धावा करु शकतो. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं योग्य ठरेल, अस कोहील म्हणाला. आयपीएलमध्ये लोकेश राहुल हा कोहलीच्या म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात होता. त्यावेळी तो विकेटकीपरची भूमिका साकारत होता. चार कसोटी भारतीय संघ 6 जुलैला वेस्ट इंडीज दौऱ्यावर दाखल होईल. टीम इंडियाच्या वेस्ट इंडीज दौऱ्याची सुरुवात ही दोन दिवसीय सराव सामन्यानं होणार आहे. सेंट किट्समध्ये 9 आणि 10 जुलैला हा सामना खेळवला जाईल. मग 14 ते 16 जुलै दरम्यान भारतीय संघ सेंट किट्समध्येच तीन दिवसीय सामना खेळणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज संघांमधली पहिली कसोटी 21 ते 25 जुलै या कालावधीत अँटिगात खेळवली जाईल. उभय संघांमधली दुसरी कसोटी जमैकात 30 जुलै ते 3 ऑगस्ट या काळात खेळवण्यात येईल. तिसरी कसोटी 9 ते 13 ऑगस्ट दरम्यान सेंट ल्युसियात, तर चौथी आणि अखेरची कसोटी 18 ते 22 ऑगस्ट या कालावधीत त्रिनिदादमध्ये खेळवली जाईल. वेस्ट इंडिज कसोटी मालिका – विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, रिद्धिमन साहा, आर. अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जाडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद सामी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दूल ठाकूर, स्टुअर्ट बिन्नी
लोकेश राहुलला संधी मिळाल्यास तो सलामीचा फलंदाज म्हणूनच खेळेल. फलंदाजीचा क्रम ऐनवेळी ठरवला जाईल. मात्र विकेटकीपर म्हणून त्याची भूमिका नसेल. कसोटीसाठी स्पेशल विकेटकीपरच असेल, त्यासाठी साहाचा पर्याय आहे, असं कोहलीने नमूद केलं. सध्या साहाची फलंदाजी सुधारली आहे. तो मोक्याच्या क्षणी धावा करु शकतो. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं योग्य ठरेल, अस कोहील म्हणाला. आयपीएलमध्ये लोकेश राहुल हा कोहलीच्या म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात होता. त्यावेळी तो विकेटकीपरची भूमिका साकारत होता. चार कसोटी भारतीय संघ 6 जुलैला वेस्ट इंडीज दौऱ्यावर दाखल होईल. टीम इंडियाच्या वेस्ट इंडीज दौऱ्याची सुरुवात ही दोन दिवसीय सराव सामन्यानं होणार आहे. सेंट किट्समध्ये 9 आणि 10 जुलैला हा सामना खेळवला जाईल. मग 14 ते 16 जुलै दरम्यान भारतीय संघ सेंट किट्समध्येच तीन दिवसीय सामना खेळणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज संघांमधली पहिली कसोटी 21 ते 25 जुलै या कालावधीत अँटिगात खेळवली जाईल. उभय संघांमधली दुसरी कसोटी जमैकात 30 जुलै ते 3 ऑगस्ट या काळात खेळवण्यात येईल. तिसरी कसोटी 9 ते 13 ऑगस्ट दरम्यान सेंट ल्युसियात, तर चौथी आणि अखेरची कसोटी 18 ते 22 ऑगस्ट या कालावधीत त्रिनिदादमध्ये खेळवली जाईल. वेस्ट इंडिज कसोटी मालिका – विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, रिद्धिमन साहा, आर. अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जाडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद सामी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दूल ठाकूर, स्टुअर्ट बिन्नी संबंधित बातम्या
मला विराटची आक्रमकता आवडते पण...: अनिल कुंबळे
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणे उपकर्णधार
खेळाचा आनंद घ्या, यश आपोआप मागे येईल- धोनी
टीम इंडियाच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
टीम इंडियाला मोठा धक्का, आर. अश्विन दुखापतग्रस्त
आणखी वाचा























