एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
200 वन डे, 31 शतकं, विराटने पॉन्टिंगला मागे टाकलं
सर्वाधिक वन डे शतकांच्या शर्यतीत सचिन तेंडुलकर आणि विराट हे दोन भारतीय फलंदाज पहिल्या दोन स्थानावर आहेत.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डेत शतक झळकावून वन डे सामन्यांचं द्विशतकही साजरं केलं. विराट हा कारकीर्दीतल्या दोनशेव्या वन डेत शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला.
याआधी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हलियर्सने हा पराक्रम गाजवला होता. विराटने डिव्हिलियर्सच्या पावलावर पाऊल टाकून कारकीर्दीतलं एकतिसावं शतक झळकावलं. त्यामुळे वन डे सामन्यांच्या इतिहासात सर्वाधिक शतकं फटकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला.
विराटनं रिकी पॉन्टिंगचा तीस शतकांचा विक्रम मोडीत काढला. सर्वाधिक वन डे शतकांच्या शर्यतीत सचिन तेंडुलकर आणि विराट हे दोन भारतीय फलंदाज पहिल्या दोन स्थानावर आहेत. सचिन तेंडुलकरने वन डे कारकीर्दीत 49 शतकं झळकावली आहेत. सचिनच्या या विक्रमापासून विराट आता 18 शतकं दूर आहे.
विशेष म्हणजे विराट वन डेच्या आतापर्यंत 192 इनिंग खेळला आहे. यामध्येच त्याने 31 शतकं पूर्ण केली. सचिनचे पहिल्या 186 इनिंगमध्ये 16, तर पाँटिंगचे पहिल्या 186 इनिंगमध्ये 15 शतकं होते. म्हणजेच विराटने या दिग्गजांच्या दुप्पट वेगाने शतकं पूर्ण केली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
निवडणूक
Advertisement