एक्स्प्लोर
क्रमवारीत कोहली घसरला, न खेळताही स्टीव्ह स्मिथ अव्वल
विराटला लॉर्ड्सला झालेल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत मिळून केवळ 4० धावाच करता आल्या. त्यामुळेच विराटची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली.

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधील अव्व्ल स्थान कायम राखता आले नाही. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात केलेल्या खराब कामगिरीचा फटका विराटला बसला आहे. विराटची पहिल्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. विराटला लॉर्ड्सला झालेल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत मिळून केवळ 4० धावाच करता आल्या. त्यामुळेच विराटची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. परिणामी आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी असलेला आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने न खेळताही अव्वल स्थान गाठले आहे. स्टीव्ह स्मिथने 929 गुणांसह अव्व्ल स्थान पटकावलं आहे. तर कोहलीच्या खात्यात सध्या 919 गुण जमा आहेत. इंग्लंडच्या जेम्स अँडरसननं लॉर्डस कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये मिळून नऊ फलंदाजांना माघारी धाडलं. याच कामगिरीमुळे त्याला कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर घेता आली. आयसीसीची कसोटी क्रिकेटमधली फलंदाजीची ताजी क्रमवारी –
- स्टिव्ह स्मिथ : 929 गुण
- विराट कोहली : 919 गुण
- जो रुट : 851 गुण
- केन विल्यमसन : 847 गुण
- डेव्हिड वॉर्नर : 820 गुण
आणखी वाचा





















